Car Care in Winter: थंडीच्या दिवसात गाडी उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी 'या' टिप्स जरुर लक्षात ठेवा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Truebil)

थंडीच्या दिवसात वाहनांसंदर्भात काही समस्या बहुतांश वेळा उद्भवतात. याचा थेट परिणाम वाहनाच्या परफॉर्मेन्सवर पडला जातो. यामुळेच गाडी सुरु होणे किंवा स्टार्ट झाल्यानंतर पिकअपसाठी वेळ लागणे. हॉर्न न वाजण्यासह लाइट्स डिम होणे अशा काही गोष्टी समोर येतात. मात्र जर तुम्ही थंडीच्या दिवसात तुमच्या गाडीची योग्य काळजी घेतल्यास ती उत्तम स्थितीत राहिलच पण त्या संदर्भातील समस्या सुद्धा उद्भवणार नाहीत.(Renault Kiger चा कंपनीने जाहीर केला पहिला टीझर व्हिडिओ, किंमत 6 लाख रुपये असण्याची शक्यता)

ऑटो एक्सपर्ट्स यांच्या मते, थंडीच्या दिवसात कारची पूर्णपणे सर्विस, बॅटरी, लाइटिंग, इलेक्ट्रिकल सिस्टिम, कुलेंट आणि टायर्सची विशेष काळजी घ्यावी. तर थंडीच्या दिवसात गाडी उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी 'या' टिप्स जरुर लक्षात ठेवा.(बाइक आणि स्कूटरचा Insurance काढण्यापूर्वी 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान)

>>बॅटरीची विशेष काळजी घ्या

बॅटरी ही कारमधील महत्वाचा भाग असल्याचे म्हटले जाते. कारण बॅटरीमुळेच कार स्टार्ट होते. मात्र जर तुमच्या गाडीची बॅटरी 3 वर्षांपेक्षा अधिक जुनी झाल्यास ती बदला किंवा मेकॅनिककडून एकदा ती तपासून घ्या. या व्यतिरिक्त कारची लाइट्स डिम झाल्यास किंवा हॉर्न वाजवताना समस्या येत असेल तर समजून जा ते खराब होणार आहे.

>>कार सर्विसिंग करा

थंडीच्या दिवसात काही वेळेस सकाळी आपण जेव्हा गाडी सुरु करतो त्यावेळी ती स्टार्ट न झाल्यास आपण त्रस्त होतो. तर ही समस्या अशा गाड्यांबद्दल उद्भवते ज्यांची वेळोवेळी आणि उत्तम पद्धतीने सर्विसिंग केलेली नाही. परंतु जर तुम्ही थंडीत लॉन्ग ड्राईव्हचा विचार करत असल्यास कारची सर्विसिंग जरुर करुन घ्या. सर्विसिंगवेळी गाडीमध्ये टाकण्यात येणारे ऑइलची क्वालिटी उत्तम आहे की नाही ते सुद्धा पहा.

>>इलेक्ट्रिक सिस्टिम सुद्धा तपासून पहा

थंडीच्या दिवसात कारमधील इलेक्ट्रिक सिस्टिम जसे स्पार्क प्लग, लाइटिंग आणि वायरिंग नीट तपासून पहा. कारण कार स्टार्ट न होण्यामागे हे सुद्धा एक कारण असून शकते. स्पार्क प्लग टर्मिनल, इंसुलेटर, रिब्स, सील्स आणि सेंट्रल इलेक्ट्रॉट पासून तयार केला जातो. ज्याच्या मदतीने दीर्घ काळ इंजिन चालू ठेवता येते.

>>टायर्सची काळजी घ्या

थंडी असो किंवा उन्हाळा नेहमीच तुमच्या गाडीच्या टायर्सची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. थंडीच्या दिवसात गाडीच्या टायर्समध्ये पुरेशी हवा असणे महत्वाचे आहे. कारण या दिवसात काहीसा ओलावा येत असल्याने रस्ते अतल्प प्रमाणात निसरडे होतात. त्यामुळे गाड्या घसरण्याची शक्यता अधिक असते. तसेच गाडीचे टायर्स झिजले असल्यास ते तातडीने बदलून घ्या.

तर वरील काही टिप्स लक्षात घेता थंडीच्या दिवसात त्याची योग्य ती काळजी घ्या. जेणेकरुन तुम्हाला प्रवासादरम्यान कोणतीही समस्या उद्भवणार नाही. गाडीची काळजी फक्त थंडीच नव्हे तर वेळोवेळी केल्यास ती दीर्घ काळ टिकण्याची अधिक शक्यता असते.