Renault Kiger (Photo Credits-Twitter)

फ्रान्सची वाहन निर्माती कंपनी रेनो यांनी बहुप्रतिक्षित सब-कॉम्पॅक्ट एसयुवीचा आज पहिला टीझर जाहीर केला आहे. दीर्घ काळापासून मार्केटमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ही कार अधिकृत रित्या पुढील वर्षात लॉन्च करणार असल्याचे संकेत दिले होते. व्हिडिओ जाहीर केल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की, या वर्षाच्या अखेर लॉन्च केली जाऊ शकते.समोर आलेल्या व्हिडिओमध्ये Kiger SUV एक बोल्ड डिझाइ न आपली छाप सोडणार आहे. ते पाहून अंदाज येतो की, यामध्ये टर्न इंडिकेटर्स, रियर वर रुफ स्पॉइलर, बॉडी कलर्ड डोअर हँडल आणि एलईडी टेल लाइट्ससह फ्युचरिस्टिक एलईडी हेडलाइट्स दिले जाणार आहे. भारतात सध्या कंपनीच्या अन्य वाहनांच्या तुलनेत Kiger चे फ्रंट डिझाइन थोडे वेगळे असणार आहे.

कंपनीच्या नव्या एसयुवीला निसान द्वारे वापर करणाऱ्या सीएमएफ- ए- मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर तयार केली जाऊ शकते. दोन्ही कार निर्माती कंपनी आपल्या कारसाठी प्लॅटफॉर्म, इंजिन आणि अन्य तांत्रिक गोष्टींची चर्चा सध्या मार्केटमध्ये सुरु आहे. जर किगर ही सीएमएफ-ए-मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर तयार केली गेल्यास ती निसानची अपकमिंग मॅग्नइट एसयुवी कारमध्ये उपलब्ध असलेल्या इंजिनसह आपली सुरुवात करु शकते.(Nissan Magnite च्या भारतातील लॉन्चिंग बद्दल खुलासा, 5.50 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता- रिपोर्ट)

फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास कारमध्ये मोठा टचस्क्रिन इंन्फोटेन्मेंट दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि कनेक्टेडकार तंत्रज्ञान लैस आहे. तर किंगरच्या इंटीरियरमध्ये ऑटोमॅटिक एसी, मल्टी फंक्शनल स्टिअरिंग व्हिल, इलेक्ट्रिक सनरुफ आणि 360 डिग्री कॅमेरा दिला जाऊ शकतो.