वाहन चालकांना आता Driving Licence आणि RC  सारखी महत्वाची कागपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही, स्मार्टफोनच्या माध्यमातून अशा पद्धतीने करा Access
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Road Transport Ministry) भारतात 1 ऑक्टोंबर पासून गाडी संबंधित अत्यावश्यक कागदपत्र बाळगण्याबद्दल काही नियमात बदल केले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे आता लोकांना वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) आणि आरसी (RC)  सारखी अन्य महत्वाची कागदपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही आहे. कारण आता ही कागदपत्रे सांभाळण्याचा त्रास संपला असून ते डॉक्युमेंट्स तुम्ही कुठे ठेवाल या संदर्भात एक महत्वाची सूचना जाहीर केली आहे.(Old Car Selling Tips: जुनी गाडी विकताना 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा, मिळेल उत्तम किंमत)

खरंतर रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री यांनी मोटार वाहन नियम 1989 संबंधित संशोधन केल्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यापासून ते डॉक्युमेंट्स बाळगण्यापर्यंतच्या काही नियमात बदलाव केले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कागदपत्रे सांभाळण्याचा त्रास कमी होणार असल्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहन संबंधित महत्वाची कागदपत्रे चालकाला आता शासकीय पोटर्ल्सवर अपडेट करता येणार आहे. केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी ऑनलाईन पोर्टल Digilocker किंवा m-parivahan चा वापर करण्यास सांगितले आहे. येथेच वाहन चालकांना आपली कागदपत्रे अपोलड करता येणार आहेत. असे केल्यानंतर वाहन चालकांना आपली कागजपत्रे डिजिटल पद्धतीने एक्सेस करता येणार आहेत.(Motor Insurance: वाहनाच्या Insurance साठी आता PUC असणे अत्यावश्यक, IRDA यांनी जाहीर केले आदेश)

दरम्यान, गेल्या वर्षात सुद्धा ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवाती पासून नव्या स्वरुपातील स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स डीएल आणि आरसी मध्ये मायक्रोचिप आणि क्यु आर कोड दिसणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ट्राफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची माहिती मिळणे सोपे होणार होते.  ट्राफिक विभागाच्या या नव्या नोटिफिकेशनमध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली होती.