प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

भारतात वाहनांच्या इन्शुरन्ससंदर्भात एक नवा आदेश जाहीर करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने जर तुमच्याकडे वाहन प्रदुषण सर्टिफिकेट म्हणजेच PUC नसल्यास इंन्शुरन्स काढता येणार नाही आहे. तर Insurance Regulatory and Development Authority म्हणजेच आयआरडीए (IRDA) यांनी हे आदेश जाहीर करत असे म्हटले आहे की, जर एखाद्या वाहनाची PUC नसल्यास इन्शुरन्स दिला जाणार नाही आहे. या नियमानुसार खासकरुन दिल्ली-एनसीआर येथे लक्ष दिले जाणार आहे.(Harley Davidson: प्रसिद्ध अमेरिकन बाइक कंपनी हार्ले डेविडसन भारतात असेंम्बली प्लांट करु शकते बंद; विक्री कमी होत असल्याने घेतला निर्णय- रिपोर्ट)

नव्या आदेशानुसार वाहनाचे इन्शुरन्स काढताना वाहनधारकाकडे पीयुसी सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. त्यामुळे अन्य महत्वाच्या कागदपत्रांसह पीयुसी सुद्धा द्यावी लागणार आहे. पीयुसी हे असे सर्टिफिकेट आहे जे वाहनातून निघाऱ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या नियंत्रण मानकांच्या बद्दल सांगते. देशात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रदुषण मानक स्तर ठरवण्यात आला आहे.

एखाद्या वाहनाची यशस्वीपणे पीयुसीची तपासणी झाल्यास वाहनधारकाला एक प्रमाण पत्र म्हणजेच सर्टिफिकेट दिले जाते. त्यामुळे वाहनातील प्रदुषणाचा स्तर किती आहे ते समजून येते. सरकारच्या नियमांनुसार सर्व वाहनांसाठी वैध पीयुसी असणे अत्यावश्यक आहे. परंतु पीयुसी नसल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागतो.(Car Safety Features: ABS ते TPMS पर्यंत 'या' 4 उत्तम सेफ्टी फिचर्स शिवाय नवी कार खरेदी करु नका)

नागरिकांना लक्षात असू द्या की, IRDAI ने जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या सर्व CEO आणि CMD यांना एक पत्र पाठवले आहे. यापूर्वी सुद्धा 2018 मध्ये याच पद्धतीचा संदेश पाठवण्यात आला होता. दरम्यान, नव्या आदेशनानुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली-एनसीआर मध्ये अधिक लक्ष दिले जाणार आहे. मोटर वाहन (संशोधन) अधिनियम 2019 अंतर्गत PUC चे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. तर हा नियम अद्याप काही राज्यात लागू आहे.