Aadhaar Card देखील Deactivate होऊ शकतं, पहा रिअॅक्टिव्हेट कसं कराल?
3 वर्ष आधारकार्डाचा वापर न केल्यास ते डिअॅक्टिव्हेट होऊ शकते. म्हणजेच केवळ नोंदणी करणं पुरेसे नाही त्याचा वापर करणंही आवश्यक आहे. अन्यथा आधार कार्ड बंद होते ही माहिती अनेकांना नसते.
आधारकार्ड हे भारतातील ग्राह्य ओळखपत्रांपैकी एक आहे. सरकरी सवलतींचा फायदा, आर्थिक घेवाणदेवाण यामध्ये KYC साठी आधारकार्डवरील 12 आकडी क्रमांक देणं अनिवार्य असतो. पण 3 वर्ष आधारकार्डाचा वापर न केल्यास ते डिअॅक्टिव्हेट होऊ शकते. म्हणजेच केवळ नोंदणी करणं पुरेसे नाही त्याचा वापर करणंही आवश्यक आहे. अन्यथा आधार कार्ड बंद होते ही माहिती अनेकांना नसते. तुमचा स्मार्टफोन बनेल तुमचे आधार कार्ड, 'या' सोप्या पद्धतींचा करा उपयोग
तुमचं आधारकार्ड डिअॅक्टिव्हेट / बंद झालंय का हे कसं तपासाल?
आधारकार्डाचं स्टेट्स पाहण्यासाठी तुम्हांला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट म्हणजे uidai.gov.in ओपन करावी लागेल.
UIDAI च्या होमपेजवर आधार सर्व्हिसच्या टॅबखाली 'व्हेरिफाय आधार नंबर' चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा म्हणजे नवं पेज उघडेल.
नव्या पेजवर तुमचा आधारक्रमांक आणि कॅप्चर वर्ल्ड टाकून ते व्हेरिफाय करावं लागेल.
यानंतर हिरव्या रंगाचं चिन्ह दिसल्यास तुमचं आधारकार्ड अॅक्टिव्ह आहे
लाल चिन्ह दिसल्यास ते डिअॅक्टीव्हेट असेल.
तुमचं आधारकार्ड डिअॅक्टिव्हेट असेल तर ते अॅक्टिव्ह कसं कराल?
आवश्यक कागदपत्र घेऊन जवळच्या एनरोलमेंट सेंटरमध्ये जा.
आधार अपडेट फॉर्म भरा. बायोमेट्रिक पुन्हा व्हेरिफाय करा.25 रूपये फी भरून तुम्हांला हे अपडेशन करून मिळेल.या प्रक्रियेदरम्यान आपल्याला एक व्हॅलिड मोबाईल नंबर द्यावा लागेल.
आधार कार्ड हे महत्त्वाचं ओळख पत्र आहे. बॅंक अकाऊंट्सपासून, पीएफ अकाऊंट सोबत त्याला लिंक करणं आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्ड सोबत लिंक करणं देखील आवश्यक आहे. सरकारी सुविधांचा उपभोग घेण्यासाठी आधार कार्ड अॅक्टीव्ह असणं आवश्यक आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2019 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

