mAadhaar App (Photo Credits-Twitter)

UIDAI ने आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांसाठी विविध सुविधा सुरु केली असल्याने त्यांची ओखळ कायम राहणार आहे. त्यामधीलच एक mAadhaar हे स्मार्टफोनसाठी अॅप सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे आधार कार्ड धारक हे कार्ड त्याच्या स्मार्टफोनमध्ये सुरक्षित ठेवू शकणार आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड कुठेही आणि कसेही उपयोगात आणता येणार आहे. तसेच समोरच्या व्यक्तीला या अॅपच्या माध्यमातून तुमची ओळख पटण्यास मदत होणार आहे. परंतु अॅन्ड्रॉईड 5.0 वरील स्मार्टफोनमध्ये हे अॅप तुम्ही डाऊनलोड करु शकणार आहात. तर लवकरच आयफोनसाठी सुद्धा ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

या अॅपमध्ये बायोमॅट्रिक लॉक आणि अनलॉक सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कोणताही गैरप्रकार होण्यास आळा बसणार आहे. एमआधार अॅपमध्ये TOTP म्हणजेच टाइम आधारित वन टाइम पासवर्ड चा उपयोग करता येणार आहे. तर या सोप्या पद्धतीने mAadhaar अॅप डाऊनलोड करुन तुमचा स्मार्टफोन आधार कार्ड बनवा.(हेही वाचा-आधार कार्ड पडताळणीसाठी आता भरावा लागणार शुल्क)

>युजर्सला गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन हे अॅप डाऊनलोड करायचे आहे.

>त्यानंतर तुमची आधार कार्डवरील सर्व माहिती यामध्ये द्यायची आहे.तर प्रोफाईल सेट करण्यासाठी उजव्या बाजूला देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे. तेथे तुम्हाला ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये अॅड प्रोफाईल ऑप्शन निवडा.

>तेथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक तुम्हाला द्यावा लागेल.

>तसेच तुमचा मोबाईल क्रमांक टाकल्यावर ओटीपी येईल. ओटीपी पोस्ट केल्यावर तुमच्या आधार कार्डवरील तुमची माहिती तुम्हाला मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे.

त्याचसोबत VID जनरेट करणे किंवा फेच करण्याची परवानगी अॅपमध्ये देण्यात आली आहे.तर विविध सुविधांसह क्युआर कोड आणि इलेक्ट्रॉनिक केवाईसीची सोय करुन देण्यात आली आहे.