भारतामध्ये वोटर आयडी (Voter ID Card )ज्याला Election Photo Identity Card देखील म्हटलं जातं. ते नागरिकांना भारताच्या निवडणूक आयोगाकडून दिलं जातं. या कार्डला जारी करण्यामागील उद्देश म्हणजे निवडणूकीमध्ये मतदाराला ग्राह्य ओळखपत्र देणं. यामुळे मोकळ्या वातावरणामध्ये मतदानाचा हक्क बजावता येतो. सामान्यपणे हे कार्ड इलेक्शन कार्ड, वोटर्स कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड म्हणून संबोधलं जातं. निवडणूकीमध्ये मतदान करण्यासाठी हे कार्ड बंधनकारक नाही. निवडणूक आयोगाकडून वोटर कार्ड नसल्यास अन्य 12 ग्राह्य आयडी कार्ड्सना स्वीकारले जाणार आहेत. पण तुम्हांला हे कार्ड काढून घ्यायचं असल्यास काय करायला हवे? हे नक्की जाणून घ्या.
मतदान कार्ड काढून घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकाल. voters.eci.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा आहे. तसेक ऑफलाईन स्वरूपामध्येही अर्ज करता येऊ शकतो. Lok Shabha Elections 2024: मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक; 23 एप्रिलपर्यंत करता येणार नावनोंदणी, जाणून घ्या सविस्तर .
मतदार कार्ड साठी कसा कराल ऑनलाईन अर्ज?
National Voters' Services Portal ला भेट द्या.
त्यानंतर उजव्या बाजूला वरच्या दिशेला असणारा ‘Sign-Up’ चा पर्याय निवडा.
तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल आयडी सोबत captcha टाकून ‘Continue’चा पर्याय निवडा.
तुमचं संपूर्ण नाव, पासवर्ड, कंफर्म पासवर्ड आणि ‘Request OTP’चा पर्याय निवडा.
आता ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
आता लॉगिन करा. त्यासाठी मोबाईल नंबर, पासवर्ड आणि captcha तसेच ‘Request OTP’ चा पर्याय निवडावा लागणार आहे.
मोबाईल वर अलेला ओटीपी टाकून ‘Verify & Login’वर क्लिक करा.
‘New registration for general electors’ खालील ‘Fill Form 6’ च्या बटणावर क्लिक करा.
फॉर्म 6 मध्ये आता तुम्हांला सारी माहिती नीट भरावी लागणार आहे. सारे तपशील नीट तपासून ‘Preview and Submit’ बटण वर क्लिक करा.
ऑनलाईन प्रमाणे ऑफलाईन देखील मतदार कार्ड काढण्यासाठी अर्ज करू शकाल त्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये Form 6 भरून देणं आवश्यक आहे.
मतदार कार्ड साठी कोणती कागदपत्रं आवश्यक?
मतदार कार्ड काढण्यासाठी तुमचा आयडी प्रुफ, रहिवासी पत्ता चा पुरावा, जन्म तारखेचा पुरावा आणि एक फोटो आवश्यक आहे. 18 वर्ष पूर्ण झालेला भारतीय नागरिक मतदार कार्ड काढू शकतो.
मतदार कार्ड चं स्टेटस कसं तपासल?
National Voters' Services Portal ला भेट द्या.
‘Login’वर क्लिक करा.
लॉगिन झाल्यानंतर ‘Track Application Status’ चा पर्याय निवडा.
reference number टाकून तुमचं राज्य निवडा आणि ‘Submit’वर क्लिक करा.
आता तुमचं voter registration status स्क्रिन वर दिसणार आहे.
reference ID हा एक युनिक नंबर असतो जो तुम्हांला acknowledgement slip वर दिला जातो. तुम्ही राज्य निवडणूक कार्यालयाला भेट देऊन आणि तुमचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता तपशील देऊन मतदार नोंदणी स्थिती तपासू शकता. अधिकारी तुम्हाला मतदार नोंदणी स्थिती तपासतील आणि माहिती देतील.
ज्या कार्डधारकांना त्यांच्या मतदार ओळखपत्रात त्यांच्या तपशिलांमध्ये आवश्यक बदल/दुरुस्ती करायची आहे ते जवळच्या निवडणूक कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन किंवा ऑनलाइन नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टलवर लॉग इन करून आणि अपडेट केलेल्या तपशीलांसह फॉर्म 8 भरून करू शकतात. तुम्ही राज्य निवडणूक कार्यालयात किंवा पोर्टलवर ऑनलाइन सहाय्यक कागदपत्रांसह फॉर्म 8 सबमिट केल्यानंतर, बूथ स्तर अधिकारी तुमच्या अर्जावर प्रक्रिया करतील आणि तुमच्या मतदार ओळखपत्रात आवश्यक बदल करतील.