Lok Sabha Elections 2024: मतदार कार्ड नाही? मग पहा कोणत्या ओळखपत्रांच्या मदतीने करू शकाल मतदान !
पॅन कार्ड, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड सह एकूण 12 ओळखपत्रांना ग्राह्य धरलं जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
19 एप्रिल पासून देशात लोकसभा निवडणूकीसाठी पहिला मतदानाचा टप्पा सुरू आहे. आता अगदीच 8-9 दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने मतदाना दिवशी कोणकोणती ओळखपत्र ग्राह्य धरली जाणार याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या ओळखपत्रांमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड सह एकूण 12 ओळखपत्रांना ग्राह्य धरलं जाईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे मतदार या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्राच्या आधारे मतदान करू शकणार आहे. How to Know Polling Booth Online: लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी तुमचं मतदान केंद्र कुठं? बुथ क्रमांक कोणता ? electoralsearch.eci.gov.in वर असं पहा एका क्लिक वर!
पहा ट्वीट
मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरलेल्या इतर १२ प्रकारांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.#LokSabhaElection2024 pic.twitter.com/xVHrPtpyDh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2024 09:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

