लोकसभा निवडणूकीचा पहिला टप्पा आता अवघ्या आठवड्याभरावर आला आहे. देशासाठी यंदाची लोकसभा निवडणूक निर्णायक आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन केलं जात आहे. मग या निवडणूकीत मतदान करण्यासाठी तुमचं मतदान केंद्र कुठं आहे? त्याच्याशी निगडीत माहिती आता घरबसल्या ऑनलाईन मिळणार आहे. electoralsearch.eci.gov.in किंवा Voter Helpline App वर तुमचा मतदान कार्ड (EPIC) क्रमांक आणि राज्य टाकून मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे.
कशी मिळवाल मतदान केंद्राची माहिती?
राज्यात ९८,११४ मतदान केंद्र आहेत. तुमचं मतदान केंद्र कुठंय ? बुथ क्रमांक कोणता ? माहिती करुन घ्या एका क्लिकवर !
मतदान कार्ड (EPIC) क्रमांक लक्षात ठेवा. उदा.:-(UPR12345XX)https://t.co/RKv0kQtAMd किंवा Voter Helpline App चा वापर करा.#लोकसभानिवडणूक२०२४#GeneralElections2024 pic.twitter.com/JV5fkonWt0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)