New PAN Card Application: महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक पॅनकार्ड (PAN Card) तुम्हाला नवे बनवायचे आहे? पॅन म्हणजे परमनेंट अकाऊंट नंबर. हा 10 आकडी अल्फान्युमरिक नंबर असतो जो आयकर विभागाकडून (Income Tax Department) जारी करण्यात येतो. हा नंबर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. पॅन नंबर द्वारे आयकर विभागास संभाव्य आयकर निर्धारकाद्वारे केलेले सर्व व्यवहार ओळखणे शक्य होते. या व्यवहारांमध्ये कर देयके, टीडीएस / टीसीएस आणि प्राप्तिकर परतावा यांचा समावेश आहे. याशिवाय पॅनला बँक खाते किंवा डिमॅट खाते उघडणे, मोठे व्यवहार करणे यासारखी अनेक कामे करणे आवश्यक आहे. पॅन कार्ड बहुतेक संस्थांमध्ये ओळखपत्र म्हणून देखील स्वीकारले जाते.
पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. पॅन कार्डसाठी नेमका कोठे अर्ज करायचा? कसा करायचा? यासाठी नेमका किती खर्च येतो? याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया... (तुमचे आधार कार्ड आणि पॅनकार्डवरील नाव वेगवेगळे आहे का? कोणत्याही अडचणीशिवाय ते कसे दुरुस्त करता येईल हे जाणून घ्या)
पॅनकार्डसाठी कोणता फॉर्म भरावा?
पॅन कार्ड 49A (भारतीय नागरिकांसाठी 49A आणि परदेशी नागरिकांसाठी 49AA) फॉर्म भरावा लागेल. (How To Check PAN Card is Fake or Real: पॅन कार्ड ची सत्यता कशी तपासाल? जाणून घ्या सोपी पद्धत)
पॅनकार्ड अर्ज कोठे दाखल करावा?
पॅनकार्ड अर्ज NSDL किंवा UTIITSL वेबसाईटवर ऑनलाईन माध्यमातून जमा करावी लागेल. यासाठी वेबसाईट्स आहेत: www.tin-nsdl.com आणि utiitsl.com
किती शुल्क आकारले जाईल?
पॅनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी 93 ते 864 रुपये (जीएसटी सोडून) शुल्क आकारले जाईल. इनकम टॅक्स वेबसाईटनुसार देशातील पत्त्यासाठी 93 रुपये + जीएसटी असे शुल्क आकारले जाईल. तर देशाबाहेरील पत्त्यासाठी 864 रुपये + जीएसटी असे शुल्क आकारण्यात येईल.
शुल्क कसे भरावे?
पॅनकार्डसाठी क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा डिमांड ट्राफ्ट किंवा नेट बँकींगच्या माध्यमातून तुम्ही शुल्क भरु शकता.
तसंच पॅन कार्डवरील नाव बदलायचे असल्यास किंवा इतर काही अडचणी असल्यास त्याही तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून सोडवता येतील. पॅनकार्ड मिळाल्यानंतर ते आधार कार्ड सोबत लिंक करणे देखील गरजेचे आहे.