हल्ली व्हिडीओग्राफी (Video Graphy) किंवा फोटोग्राफी (Photography) करण्याचा छंद प्रत्येकालाचं आहे. प्रत्येकाला आपण केलेली फोटोग्राफी किंवा आपले क्लीक केलेले फोटोग्राफ्स अधिकाधिक आकर्षक असावे असं वाटतं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एडिटींग स्कीलचा (Editing Skills), विविध कॅमेरांचा (Camera) किंवा हाय रिसोलुशन लेन्सेसचा (High Resolution Lenses) वापर केला जातो. पण सध्या सर्वात लोकप्रिय आहे ती ड्रोन फोटोग्राफी. अनेकांना टॉप अगलने घेतलेले ड्रोन शॉट्स (Top Angle Drone Shots) आवडतात. आपल्या फोटोस किंवा व्हिडीओमध्ये ड्रोन शॉट्स (Drone Shots) असणं ही प्रत्येकाला हल्ली आवश्यक बाब वाटते. तुम्हाला ड्रोन कॅमराने शुट करायचा असल्यास तुमच्याकडे सर्वप्रथम ड्रोन कॅमरा असणं गरजेचं आहे. फक्त ड्रोन कॅमरा असूनचं चालणार नाही तर तो ड्रोन कॅमरा वापरण्याचं विशेष तंत्रज्ञान पण तुम्हाला असणं तेवढचं आवश्यक आहे.
एवढचं नाही तर ड्रोन कॅमरा (Drone Camera) वापरण्यासाठी तुमच्याकडे ड्रोन कॅमरासाठीचा परवाना असणं अनिवार्य आहे. विना परवाना (Drone Camera Licence) तुम्ही ड्रोन उडवू शकत नाही. सरकारकडून ड्रोन उडवण्यासाठी विशेष नियम बनवले आहेत. या सरकारी नियमाचे उल्लंघन केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे ड्रोन उडवण्याआधी किंवा ड्रोन फोटोग्राफी (Drone Photography) करण्यापूर्वी त्याचे नियम व कायदा काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. (हे ही वाचा:-)
ड्रोन उडवण्याआधी सर्व ड्रोन पायलटला (drone Pilot) ड्रोन डिजिटल नोंदणी करावी लागते. सोबत सर्व ड्रोनची उपस्थिती आणि त्याच्या उड्डाण संबंधी माहिती आधीच द्यावी लागते. प्रत्येक ड्रोनची एक विशिष्ट ओळख संख्या (UIN) असते. या (UIN) नंबरला सांभाळून ठेवणे गरजेचे असते. (UIN) नवीन आणि आधीच्या सर्व UAV साठी बंधनकारक आहे. २५० ग्राम ते ५०० किलो ग्राम पर्यत वजनाचे ड्रोन सध्या बाजारात आहेत. तरी आपल्या सर्वसामान्य फोटोग्राफिसाठी किमान २ किलोचा ड्रोन वापरता येता त्यापेक्षा अधिक मोट्या साईजचा ड्रोन उडवल्यास १ लाखांपर्यतचा दंड भरावा लागू शकतो.