Rule Changes From 1 January 2024: नवीन वर्ष 2024 (New Year 2024) मध्ये पैशाशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यातील अनेक बदल तुम्हाला फायदेशीर ठरतील, तर काही तुम्हाला अडचणीतही टाकू शकतात. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder)ची किंमत, लहान बचत योजनांवरील व्याज, डीए (DA), आयटीआर (ITR), बँक लॉकर (Bank Locker) आणि UPI आयडी यांच्याशी संबंधित बदलांचा समावेश आहे.
आयकर रिटर्न -
आर्थिक वर्ष 2022-23 साठी विलंबित किंवा सुधारित आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. तुम्ही अजून तुमचा ITR भरला नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत फाईल करा. यानंतर तुम्ही आर्थिक वर्ष 022-23 साठी आयटीआर दाखल करू शकणार नाही. अशा परिस्थितीत आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. या अंतर्गत तुम्ही ITR दाखल न केल्यास तुरुंगातही जाऊ शकता. (हेही वाचा - DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठ गिफ्ट; नवीन वर्षात महागाई भत्ता होणार निश्चित)
एलपीजी सिलेंडर -
राजस्थानमधील उज्ज्वला लाभार्थ्यांना 1 जानेवारीपासून स्वस्त एलपीजी सिलिंडर मिळणार आहे. या लोकांना LPG सिलेंडर फक्त 450 रुपयांना मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे. त्याचबरोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्याही घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर ठरवतात. याचा परिणाम देशभरातील ग्राहकांवर होणार आहे. (हेही वाचा - UPI Transaction Data: आर्थिक वर्ष 2023 मध्ये UPI व्यवहार 8,572 कोटींपर्यंत वाढले; भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा)
अल्पबचत योजनेवर व्याज -
केंद्र सरकारने अलीकडेच चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी म्हणजेच जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीसाठी छोट्या बचत योजनांवर व्याजदर जाहीर केले आहेत. यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात 0.20 टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे. इतर सर्व लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल नाही. अशा प्रकारे 1 जानेवारीपासून सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2 टक्के आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.1 टक्के व्याजदर असेल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता -
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता म्हणजेच डीए 1 जानेवारीपासून लागू होईल. मात्र, मार्चमध्ये त्याची घोषणा होऊ शकते. यावेळी डीए 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीए 50 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
गाड्या महाग होतील -
अनेक मोठ्या कार कंपन्या नवीन वर्षात आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. ऑडी 1 जानेवारीपासून भारतात आपल्या वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवत आहे. याशिवाय मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि मर्सिडीजसारख्या कंपन्याही किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.
UPI आयडी -
एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरला नसलेला UPI आयडी आता निष्क्रिय होईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेमेंट अॅप्सना नवीन वर्षात असे करण्यास सांगितले आहे. तुम्ही गेल्या एक वर्षापासून तुमचा UPI आयडी वापरला नसेल, तर एकदा त्याद्वारे व्यवहार करा.
लॉकर करार -
सुधारित बँक लॉकर करार सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 आहे. तुम्ही 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बँक लॉकर करारनामा सबमिट केला नसेल तर तुमचे लॉकर नवीन वर्षात गोठवले जाऊ शकते.