
देशभरातून मोठ्या संख्येने नागरीक मुंबईत नोकरीसाठी येतात. पैसा कमावतात पण दिवाळी, दसरा, छटपूजा यांसारख्या मोठ्या सणांना चाकरमानी आपआपल्या गावी जातात. मुंबईहून बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अंतर अधिक असल्याने या भागातील चाकरमानी रेल्वे प्रवासाचा मार्ग अवलंबतात. तरी सध्या या मार्गावर रेल्वे गाड्या मुळातचं कमी आहे त्यात सणासुदीच्या दिवसांत या गाड्यांचं तिकिट मिळणं अवघड होतं म्हणून मध्य रेल्वे खास ८२ फेस्टीव्हल ट्रेन चालवणार आहे. तरी नव्याने चालवणाऱ्या ट्रेनच्या आरक्षणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. एवढचं नाही तर महाराष्ट्राच्याही कानाकोपऱ्यातून चाकरमानी मुंबईत येतात त्याच पार्श्वभुमिवर राज्यातही काही लांब पल्ल्याच्या विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. तसेच नव्याने चालवणार असले या ८२ रेल्वेच्या तिकिट बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे.
जाणून घ्या कुठल्या रेल्वेच्या किती वाढीव फेऱ्या:-
लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस असून एकूण 8 फेऱ्या मारणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही उत्तर प्रदेशातील नागरिकांसाठी साप्ताहिक विशेष ट्रेन 4 फेऱ्या मारणार आहे. मुंबई-मालदा टाऊन ही साप्ताहिक विशेष ट्रेन सीएसएमटी ते मालदा 4 फेऱ्या लगावणार आहे. दादर-गोरखपूर विशेष लोकल आठवड्यातून चार दिवस 36 फेऱ्या मारणार आहे तर दादर-बलिया ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस एकूण 26 फेऱ्या लगावणार आहे. परराज्यातील नागरिकांप्रमाणेच राज्यातील चाकरमान्यासाठी ही विशेष मुंबई-नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- ज्येष्ठांसाठी रेल्वे प्रवासात हमखास लोअर बर्थ चं तिकिट कसं काढायचं? IRCTC नेच केला थेट खुलासा)
या विशेष गाड्यांचे थांबे, वेळापत्रक, तिकीट बुकिंग, रेल्वेची रचना, गाडीनंबर या संबंधीत सविस्तर माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. www.enquiry.indianrail.gov.in या संकेस्थळाला भेट देत तुम्ही लगेच तुमचं तिकीट बुक करु शकता.