Fake | (Photo Credits: depositphotos)

ऑनलाईन फ्रॉडर्स (Online Fraudsters) नेहमीच गळ टाकून बसलेले असतात. एखादी साधी, निष्पाप व्यक्ती जाळ्यात फसतात त्या व्यक्तीला लुबाडले जाते. दरम्यान, ऑनलाईन फ्रॉडर्सचे हे जाळे आता विविध क्षेत्रात विस्तार आहेत. अनेक लोकांची यात फसवणूकही होत आहे. लोकप्रिय जॉब पोर्टल नोकरी.कॉम (Naukri.com) ने अलिकडेच लोकांना मेल पाठवून ऑनलाईन फ्रॉडर्स आणि फेक जॉब्सपासून (Fake Jobs) सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. (New Online Fraud: नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणाची ऑनलाईन फसवणूक, बँक खात्यातून पैसे गायब, सतर्क राहण्यासाठी पहा हा व्हिडिओ)

ऑनलाईन फ्रॉडचे जाळे विस्तारत असताना त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही ऑफर आल्यास त्याकडे डोळसपणे पहा. लगेचच अंधविश्वासाने कोणतेही पाऊल उचलू नका. मात्र फेक जॉब्स हे नेमके ओळखायचे कसे? असा प्रश्न सामान्यांना पडला असेल. तर जाणून घेऊया फेक जॉब्स ओळखण्याच्या काही ट्रिक्स...

पैसे मागणे:

जर एखाद्या पोस्टमध्ये रजिस्ट्रेशन किंवा इतर कारण्यासाठी पैसे मागत असतील, तर हमखास ती फेक पोस्ट आहे. कोणतीच कंपनी बॉन्ड किंवा डिपॉझिट, रजिस्ट्रेशनच्या नावाखाली पैसे मागत नाही.

खाजगी माहिती मागणे:

क्रेडिट कार्ड डिटेल्स, पॅन कार्ड, आधार कार्ड यांसारखी खाजगी माहिती कोणत्याही रिक्रुटरसोबत शेअर करु नका.

Job Description नीट लिहिलेले नसणे:

फेक जॉब ओळखण्याचा अजून एक मार्ग म्हणजे Job Description नीट लिहिलेले नसणे. Job Description चे बेसिक स्ट्रक्चर आणि क्वालिटी डिसेंट असणे आवश्यक आहे.

पगाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक पगाराचे आमिष:

अपेक्षेपेक्षा अधिक पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची एक ट्रिक असते.

अपुरी माहिती:

कंपनी, कंपनीचे काम आणि पॅकेज याबद्दल अपुरी माहिती असणाऱ्या पोस्ट दुर्लक्षित केलेल्याच बऱ्या.

अलिकडेच रेल्वे आणि एअर फोर्समध्ये नोकरी मिळवण्याचे आमिष दाखवून काही लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी वायुदलातील सैनिकाला अटक करण्यात आली होती. 2015 मध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या व्यक्तीचा शोध सुरु आहे. त्याच्याविरुद्ध  non-bailable warrant जारी करण्यात आले होते. या फसवणूकीच्या रॅकेटमध्ये आरोपीने साथीदारांसह 18 जणांची फसवणूक केली असून त्यांच्याकडून 2 कोटी 70 लाख रुपये उकळले आहेत.

दरम्यान, नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींची फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे उकळणारे बहुतेक रॅकेट बाजारात अजूनही अॅक्टीव्ह आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी अप्लाय करण्यापूर्वी पडताळणी करणे आवश्यक आहे.