Driving License (Photo Credit: PTI)

ड्रायविंग लायसन्स (Driving License) म्हणजे चालक परवाना काढायचा म्हणटलं की आता RTO च्या वाऱ्या कराव्या लागणार असा प्रश्न सगळ्यां पुढे येतो. त्यात सरकारी काम म्हटलं की आणखीचं अवघड. पण आता हे अवघड काम अगदी सोप्या पध्दतीने तुम्हाला घरबसल्या करता येणार आहे. फक्त वाहन परवाना काढणचं नाही तर तो वाहन परवाना तुम्हाला अपडेट (Driving License Update) करायचा असल्यास तो देखील तुम्ही सहज RTO मध्ये न जाता करु शकता. आधी RTO मध्ये जाऊन कागदपत्र (Documents) भरून सबमिट (Submit) करणं, त्यानंतर पुन्हा पुढच्या प्रक्रियेसाठी जाणं अशा अनेक गोष्टींसाठी सतत RTO च्या फेऱ्या माराव्या लागयच्या पण आता ही सगळी प्रक्रीया घरबसल्या झटपट ऑनलाईन अर्ज (Online Application) करत तुम्ही करु शकता.

 

भारत सरकारनं (Government Of India) ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवण्याची प्रक्रिया डिजिटल केली आहे. ऑनलाईन (Online) प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही अगदी सहज परवाना मिळवू शकता. डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रीयेतून (Digital Driving License Procedure) तुम्ही शिकाऊ परवाना (Learning License) तसेच कायमस्वरुपी (Permanent License) अशा दोन्ही परवान्यासाठी अर्ज करु शकता. तरी आता शिकाऊ परवाना मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन (Online) झाली असुन तुम्ही घरबसल्या शिकाऊ परवाना डिजिटल पद्धतीनं मिळवू शकता. पण कायमस्वरूपी परवान्यासाठी मात्र तुम्हाला आरटीओला (RTO) जाणं अनिवार्य आहे. (हे ही वाचा:- Aadhaar Card Updates Process: आधार कार्डमध्ये तुम्ही 'इतक्या' वेळा करू शकता अपडेट; काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या)

 

https://parivahan.gov.in/parivahan/ या सरकारी अधिकृत संकेतस्थळाला (Official Website) भेट देत तुम्ही परवानासाठी अर्ज करु शकता. तुम्हाला  शिकाऊ परवाना हवा असल्यास तुम्ही या संकेतस्थळावर सहज सगळी माहिती भरत शिकाऊ परवाना मिळवू शकता. पण तुम्हाला कायमस्वरुपी परवाना हवा असल्यास तुम्ही याच संकेत स्थळावरुन तुमची आरटीओ अपॉइंटमेंट बूक (RTO Appointment Booking) करु शकता.