Aadhaar Card Updates Process: भारतील प्रत्येक नागरिकांना आपली ओळख म्हणून भारत सरकारने आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य केलं आहे. आधार कार्डमध्ये 12 अंकी एक अद्वितीय क्रमांक छापलेला असतो. हा नंबर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे जारी केला जातो. प्रत्येक ठिकाणी व्यक्तीची ओळख म्हणून आधार कार्ड क्रमांक आवश्यक बनला आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक असणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच पॅन कार्डशी आधार लिंक करणे हेदेखील सरकारने अनिवार्य केलं आहे.
तुम्ही तुमच्या आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा नावातील चूक दुरुस्त करू शकता. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही हे बदल किती वेळा करू शकता? हे बदल करण्यासाठी तुम्हाला किती शुल्क लागेल. यासंदर्भात अधिक माहिती आम्ही तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे देत आहोत. (हेही वाचा - New Rules From 1 September: 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' नियम; 'असा' होईल थेट तुमच्या खिशावर परिणाम)
आधार किती वेळा काढले जाऊ शकते?
आधार क्रमांक कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच जारी केला जातो. आधार कार्डमध्ये 12 अंकी क्रमांक असतो. हा 12 अंकी क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा आहे. त्यात संबंधित व्यक्तीची माहिती असते. त्यात त्याचे नाव, पालकांचे नाव, वय, पत्ता इत्यादी माहिती असते. नावात काही चुका झाल्या असतील तर तुम्ही ते बदलू शकता. मात्र, UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने त्याची मर्यादा निश्चित केली आहे.
तुम्ही आधारमध्ये किती वेळा सुधारणा करू शकता?
UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. UIDAI नुसार, आधार कार्ड धारक आयुष्यात फक्त दोनदा पत्ता बदलू शकतो. तसेच, तुम्ही आधारमध्ये तुमची जन्मतारीख फक्त एकदाच बदलू शकता. आधार डेटामध्ये तुम्ही तुमचे नाव वारंवार बदलू शकत नाही. तुम्ही आयुष्यात फक्त एकदाच आधारमध्ये लिंग माहिती अपडेट करू शकता.
आधार कार्डमधील बदलासाठी किती शुल्क द्यावे लागते?
UIDAI नुसार, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतेही डेमोग्राफिक (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग इत्यादी) अपडेट करायचे असतील तर त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. त्याच वेळी, बायोमेट्रिक (आयरिस, फिंगर प्रिंट इ.) अपडेटसाठी, 100 रुपये शुल्क आकारले जाते. तर, मुलांसाठी आवश्यक असलेली आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत आहेत.
आधार कार्ड अपडेटसाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक -
आधार बदलण्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. आधारमध्ये कोणत्याही प्रकारचे अपडेट करण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला दुरुस्तीसाठी अर्ज करावा लागेल. येथे तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर द्यावा लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.