EVM मशीन हॅक होण्याचे अनेक ठिकाणी आरोप करण्यात आले आहेत. परंतु खरंच या EVM मशीन हॅक होतात का याचा आज आपण वेध घेणार आहोत.
देशात एकूण 80 कोटी मतदार आहेत तर 2000 राजकीय पक्ष आहेत. या इतक्या मोठ्या गोतावळ्यात निवडणुका लढवणं हे सोपं काम नाही. त्यातच आधी असलेली मतदानाची प्रक्रिया ही फेल ठरली कारण अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी मतदानाचे बूथच आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती.
पण ही सगळी प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक व्हावी म्हणून EVM मशीन भारतात आणल्या गेल्या. पण आता हीच EVM मशिन्स वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. 2014 साली असा आरोप अमेरिकेतील एका तंत्रज्ञाने केला होता. परंतु भारताच्या निवडणूक आयोगाने हा आरोप साफ खोटा ठरवला आहे.
आजवर या EVM मशीन्स देश पातळीवरील 3 निवडणुकांत आणि राज्यातल्या 113 निवडणुकांमध्ये वापरली गेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सांगण्यानुसार मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार, गडबड करता येत नाही. आणि जर कोणी तसे मॅन्युअली यंत्रामध्ये फेरफार करायचा प्रयत्न केलाच तर ते टिपता येतं असं निवडणूक आयोगाचं मत आहे. याच दाव्याला राजकीय पक्षांनी मात्र कायमच आव्हान दिलं आहे.
एक्झिट पोल म्हणजे नक्की काय? खरंच त्याने मिळतो का निकालाचा अंदाज? वाचा सविस्तर
बीबीसी मराठीने नमूद केल्यानुसार, आठ वर्षांपूवी मिशीगन या विद्यापीठात एक प्रयोग करण्यात आला होता. घरगुती स्वरूपाचं उपकरण तयार करण्यात आलं आणि हे मशीन EVM शी जोडण्यात आलं. मोबाईल फोनद्वारे पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजद्वारे मतदान यंत्रात नोंदण्यात आलेलं मत बदलता आलं. मात्र भारतीय निवडणूक अधिकाऱ्यांनी याही प्रयोगाला फेटाळून लावलं आहे. इतकंच नाही तर मशीनचा ताबा मिळवणंही कठीण असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.