
For Buying New Home Or Property: प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं एखादा हक्काचं घर असावं. अनेक ठिकाणी आपण नवीन कन्स्ट्रक्शन किंवा नव्या एनए प्लॉटच्या जाहिराती बघतो. रिव्हर फेसिंग, स्टेशनपासून जवळ, स्विमिंग पूल, जिम, अशा अनेक सुविधा देखील या जाहिरातींमध्ये पाहायला मिळतात. अगदी बस, रेल्वेमध्ये, वृत्तपत्रांमध्ये किंवा फ्लेक्स लावून या मोठमोठ्या जाहिराती झळकतात आणि सामान्य नागरिकांचं लक्ष वेधून घेतात. परंतु, या जाहिरातींमध्ये किती तथ्य आहे? नमूद केलेल्या सर्व गोष्टी खरंच मिळणार आहेत का? हे सर्व तपासून तर घ्याच पण त्याहीसोबत आणखी काही महत्त्वाच्या बाबींची देखील योग्य माहिती मिळवा. पण या महत्त्वाच्या बाबी कोणत्या त्याची यादी आम्ही खाली नमूद केली आहे.
1- फ्लॅट विकत घेताना त्या फ्लॅटचा कार्पेट एरिया, बिल्ट अप एरिया तपासून घ्या.
2- स्थानिक प्रशासनाने दिलेला संबंधित जागेचा किंवा घराचा मान्यताप्राप्त आराखडा नक्की तपासून घ्या.
3- बिल्डरकडे सॅंक्शन टाऊन प्लॅनिंगची प्रत पाहून घ्या.
4- प्रशासनाने बिल्डरला दिलेला पूर्णत्वाचा दाखला नक्की तपासून घ्या. कारण हाच दाखला बँक लोनसाठी महत्वाचा असतो.
5- तुमच्या फ्लॅटच्या बिल्डरकडून पझेशन लेटर म्हणजेच मालकीपत्र घ्या कारण ते घेतल्याशिवाय तुम्ही त्या फ्लॅटचे कायदेशीर मालक होत नाही.
6- फ्लॅट किंवा घराच्या भाडे किंवा खरेदीचा योग्य मुद्रांकाच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र करा.
महत्त्वाचे म्हणजे जाहिरातींना भुलून जाऊ नका, कारण जालंदरीत्या केलेल्या व्यवहारात अनेकदा फसवणूक करण्यात येते. आणि अखेर वेळेवर घराचा ताबा न मिळाल्याने तुम्हाला दुसरीकडे भाडे देऊन राहावे लागू शकते. तसेच आपण ज्या जागेवर घर किंवा फ्लॅट घेणार आहोत, त्याच्या मिळकतीचा इतिहास शासनाच्या वेबसाईटवरुन igrmaharashtra .gov.in किंवा जिल्हा निबंधकाच्या कार्यालयातून तपासून घेता येऊ शकतो.