CIDCO Lottery 2019: 'सिडको' च्या उर्वरित 76 घरांंसाठी निघणार लॉटरी; 3 जानेवारी पर्यंत करा lottery.cidcoindia.com वर अर्ज
CIDCO Houses | Image used for representational purpose | Photo Credits : commons.wikimedia

CIDCO Lottery Vastuvihar and Unnati 2019: सिडकोच्या सुमारे 10,000 घरांसाठी 26 नोव्हेंबर दिवशी लॉटरी निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता सिडकोकडून खारघर आणि उलवे परिसरात उर्वरित 76 घरांसाठी आता लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. 28 नोव्हेंबर पासून या अर्जांसाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 1 रूम किचन पासून 2 बीएचके फ्लॅट्स उपलबब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही देखील नवी मुंबईमध्ये नवं घर घेण्याच्या शोधात असाल तर वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नती अशा सदानिका उपक्रमांमध्ये अर्ज करू शकता. lottery.cidcoindia.com या सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हांला या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. नवी मुंबई मध्ये सिडको 'प्रधानमंत्री आवास योजना' अंतर्गत अजून 1 लाख 10 हजार घरं बांधणार.

गृहनिर्माण योजनांपैकी वास्तुविहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 45, तर उन्नती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 31अशी एकूण 76 घरं उपलब्ध आहेत. 3 जानेवारी 2020 पर्यंत यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी सिडकोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. इथे पहा सिडकोच्या घरांची जाहिरात

वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नती सदनिकांची अधिक माहिती

एकूण घरं : 76

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 3 जानेवारी 2020

रजिस्ट्रेशन एडीट करण्याची अंतिम तारीख : 4 जानेवारी 2020

ऑनलाईन पेमेंट : 8 जानेवारी 2020

लॉटरी निकाल : 22 जानेवारी 2020

वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नती सदनिकांच्या उपलब्ध घरांची किमान किंमत 16 लाख तर कमाल किंमत 1 कोटीच्या वर आहे. किफायतशीर दरात घर उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे मुंबईत म्हाडा गृहप्रकल्प केले जातात तसेच नवी मुंबईत सिडको कडून घरं बांधली जातात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत 2.10 लाख घर उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सांगण्यात आली आहे.