AIIMS Recruitment 2021: दिल्लीच्या एम्स मध्ये Senior Consultant, Consultant पदावर होणार नोकरभरती; 15 जुलै पूर्वी becil.com वर असा करा अर्ज
AIIMS Hospital in Delhi (PC - PTI)

सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी एक गूड न्यूज आहे. इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड (becil) कडून दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये (Delhi AIIMS) नोकरभरती बाबत एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिट (पीएमयू) मध्य कन्सलटंट (Consultant) आणि सीनियर कन्सलटंट (Senior Consultant) या पदांसाठी ही नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. हे नोटिफिकेशन 2 जुलै 2021 दिवशी जारी करण्यात आले असून 5 रिक्त जागांवर ही नोकरभरती होणार असून सुरूवातीला नियुक्त उमेदवाराची निवड वर्षभराची असेल आणि नंतर त्याचे काम आणि गरज पाहता कालावधी वाढवण्याबाबत निर्णय होऊ शकतो असे सांगितले आहे.

एम्स दिल्ली मध्ये सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (हॉस्पीटल मॅनेजमेंट), सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट मॅनेजमेंट), सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोक्योरमेंट), सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट फायनांशिअल मॅनेजमेंट), या पदांवर नोकरभरती केली जाईल. इच्छुक उमेदवाराला 15 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवाराला महिन्याला 50 हजार तर सिनियर कन्सल्टंटला महिन्याला लाखभर पगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Maharashtra Anganwadi Recruitment 2021: बाल विकास प्रकल्प जालना कडून होणार अंगणवाडी सेविकांची नोकरभरती; 9 जुलै पूर्वी करा अर्ज.

कसा कराल अर्ज?

  • www.becil.com ला भेट द्या आणि करियर सेक्शन निवडा.
  • त्यानंतर Advertisement Number निवडा.
  • तुमची माहिती भरा. यामध्ये शिक्षण, नाव, कामाचा अनुभव याबददल माहिती असेल.
  • नंतर स्कॅन केलेला फोटो, सही, बर्थ सर्टिफिकेट, 10 वीचं प्रमाणपत्र अपलोड करा.
  • अ‍ॅप्लिकेशन सादर करण्यापूर्वी त्याचा प्रिव्ह्यू पहा. गरज असल्यास मॉडिफाय करा.

    ऑनलाईन माध्यमातून शुल्क भरा.

  • दरम्यान काही कागदपत्रं ही इमेलच्या माध्यमातून पाठवायची आहेत ती देखील सादर करा.

ऑनलाइन अर्ज करणार्‍या उमेदवारला 750 रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. एकाहून अधिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्या पदासाठी 500 रुपये अतिरिक्त शुल्क भरावा लागेल.