भारतामध्ये सरकारकडून 18 वर्षांवरील सार्यांना कोविड 19 च्या लसीचे डोस (COVID 19 Vaccine) देण्यासाठी परवानगी दिली असली तरीही अद्याप अनेकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंटर स्लॉटच मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेकांना लस घेण्याची इच्छा आहे पण रजिस्ट्रेशन नंतर कंन्फर्मेशन मिळत नसल्याची तरूणाईची तक्रार आहे. सध्या भारतात लसींचा तुटवडा असल्याने सार्यांनाच स्लॉट मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांसाठी सध्या स्लॉट बुक करणं हे एक आव्हानचं बनलं आहे. नागरिकांना कुठे लसी उपलब्ध आहेत याची माहिती देण्यासाठी काही वेबसाईट्स, ट्रॅकर्स वेबसाईट उपलब्ध आहेत.
दरम्यान लसीचा डोस मिळावा म्हणून तुम्हांला सरकारी वेबसाईट्स अर्थात कोविन अॅप, पोर्टल, आरोग्य सेतू किंवा उमंग अॅप यावरच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. पण केवळ ट्रॅकिंग साठी या काही मंडळींनी खाजगी वेबसाईट्स बनवल्या आहेत. COVID 19 Vaccine Registration Update: 18 वर्षांवरील नागरिकांसाठी CoWIN, Aarogya Setu App, UMANG App सुरू होणार रजिस्ट्रेशन; पहा कशी असेल संपूर्ण प्रक्रिया, काय कराल, काय टाळाल?
लसीकरणासाठी उपलब्ध वॅक्सिनेशन सेंटरच्या स्लॉट साठी कुठे पहाल माहिती
- Covialerts.in COVID-19 Vaccine Tracker:
या वेबसाईटवर प्रत्येक शहरासाठी टेलिग्राम चॅनल आहे. यासाठी तुम्हांला टेलिग्राम अॅप वापरावं लागणार आहे.
- GetJab.in COVID-19 Vaccine Tracker:
यावर 18-45 वयोगटातील नागरिकांना जेव्हा स्लॉट उपलब्ध असेल तेव्हा इमेल द्वारा नोटिफिकेशन पाठवले जाईल. डेव्हलपर्सच्या दाव्यानुसार ते माहिती किंवा डाटा शेअर करणार नाहीत.
- Under45.in COVID-19 Vaccine Tracker:
या वेबसाईट वर देखील ओपन स्लॉटची माहिती देण्यासाठी टेलिग्राम चॅनेल वापरलं जातं. तुमचं राज्य आणि जिल्ह्यासाठी असलेल्या टेलिग्राम पेजला तुम्हांला फॉलो करावं लागणार आहे.
- FindSlot.in COVID-19 Vaccine Tracker:
या वेबसाईटवर कोविन अॅप कडून देण्यात आलेले API वापरून माहिती दिली जाते. सध्या कोविन कडून माहिती दिली जात नसल्याने ते रिअल टाईम मध्ये काम करू शकत नाही.
- VaccinateMe.in COVID-19 Vaccine Tracker:
या वेबसाईट वर ओपन स्लॉट्सची माहिती व्हॉट्सअॅप वर दिली जाते.
भारतामध्ये कोरोनाप्रतिबंधात्मक लसीकरणाचा कार्यक्रम 45 वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र सरकार कडून तर 18-44 वर्षासाठी राज्य सरकारकडून चालवला जात आहे. सध्या कोरोना रूग्णांच्या वाढीचा दर कमी करण्यासाठी लसीकर्ण वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आतपर्यंत 16,25,13,339 डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.