Small Saving Schemes Interest Rate: केंद्र सरकारने (Central Government) पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमचे व्याजदर (Small Saving Schemes Interest Rate) जाहीर केले आहेत. सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम (Small Saving Schemes) च्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. याचा अर्थ जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जे व्याजदर निश्चित करण्यात आले होते तेच व्याजदर पुढील तीन महिने कायम राहणार आहेत.
लहान बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना (POTD), महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) यांचा समावेश होतो. (हेही वाचा -Interest Rates on Deposits and Lending Deregulated: ठेवी आणि कर्जावरील व्याजदर नियंत्रणमुक्त: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास)
लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही -
दरम्यान, अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या तिमाहीसाठी लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ला ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 पर्यंत 7.1% व्याजदर मिळत राहील. (हेही वाचा - GPF Interest Rate: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या PF योजनांसाठी 7.1 टक्के व्याजदर जाहीर)
'या' दोन योजनांना सर्वाधिक व्याजदर -
केंद्र सरकार सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनवर सर्वाधिक व्याजदर देत आहे. दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूकदारांना 8.2 टक्के व्याज मिळत आहे. त्यानंतर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. गुंतवणूकदारांना 5 वर्षांची एफडी आणि किसान विकास पत्रामध्ये 7.5 टक्के परतावा मिळत आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ होण्याची सर्वसामान्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र यावेळीही त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. डिसेंबर महिन्यात गुंतवणूकदारांना 7.1 टक्के परतावा मिळेल.
तत्पूर्वी, सरकारने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी काही लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की RD वगळता सर्व योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे, एप्रिल-जून 2020 या तिमाहीपासून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ पीपीएफच्या व्याजदरात बदल होऊन चार वर्षांहून अधिक काळ उलटला आहे.