GPF Interest Rate: मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) आणि इतर तत्सम भविष्य निर्वाह निधी योजनांसाठी 7.1 टक्के व्याज दर जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाने 3 जुलै रोजी एका परिपत्रकात म्हटले आहे की, 'सामान्य माहितीसाठी हे जाहीर केले आहे की 2024-2025 या वर्षात, सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि इतर तत्सम निधीच्या जमा झालेल्या जमा रकमेवर 7.1 दराने व्याज असेल. हा दर 1 जुलै 2024 पासून लागू होईल.
दरम्यान, जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी 7.1 टक्के व्याजदर मिळणाऱ्या योजनांमध्ये सामान्य भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा), अंशदायी भविष्य निर्वाह निधी (भारत), अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी, राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी, सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि भारतीय आयुध विभाग भविष्य निर्वाह निधी यांचा समावेश आहे. (हेही वाचा -Rule Change From 1st July 2024: 1 जुलैपासून होणार आहेत 'हे' 5 मोठे बदल; किचनपासून बँक खात्यापर्यंत दिसेल या बदलाचा परिणाम!)
केंद्राने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) सह लहान बचत योजनांचे व्याजदर 8.2 टक्के इतका निश्चित केला आहे. तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) चा व्याज दर 7.7 टक्के असणार आहे. (हेही वाचा - (हेही वाचा - महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा आता पांढर्या रेशन कार्ड धारकांनाही मिळणार; जाणून घ्या आधार सोबत रेशन कार्ड कसं कराल लिंक?)
GPF म्हणजे काय?
जनरल प्रॉव्हिडंट फंड हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. ज्यामध्ये सरकारी कर्मचारी नियमितपणे त्यांच्या पगारातील काही प्रमाणात योगदान देतात. या जमा रकमेवर सरकार ठराविक दराने व्याज देते. अर्थ मंत्रालय दर तिमाहीत या दराचा आढावा घेते. जेव्हा एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होतो तेव्हा त्याला संपूर्ण रक्कम मिळते. ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते. ही योजना केवळ कमी जोखमीच्या गुंतवणुकीत आणि कर बचतीत मदत करते. या योजनेमुळे आणीबाणीच्या किंवा कोणत्याही गरजेच्या वेळी ठराविक रक्कम काढण्यातही मदत होते.