Bank Holidays in July 2022: अनेकवेळा आपण बँकेशी संबंधित महत्त्वाच्या कामात उशीर करत असतो. परंतु, जर तुम्हीही असं करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, येत्या जुलै महिन्यात बँक जवळपास 16 दिवसांसाठी बंद राहणार आहे. तुम्ही बँकेत पोहोचलात आणि बँकेचे कुलूप लावलेले पाहून तुम्हाला निराश होऊन परतावे लागले. त्यामुळे जुलै महिन्यात तुम्ही बँकेत जाणार असाल, तर प्रथम तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासली पाहिजे.
जुलै महिन्यात बँका 16 दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात मुलांच्या शाळा सुरू होतात आणि मुलांच्या प्रवेशासाठी आणि इतर खर्चासाठी पैशांची गरज असते. अशात जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता. म्हणूनच बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते वेळेत पूर्ण करा. कारण जुलै महिन्यात अनेक सुट्ट्या असतात. चला तर मग पाहूया त्या सुट्ट्यांची लांबलचक यादी. (हेही वाचा - Aadhaar-PAN Linking: पॅन-आधार कार्ड लिंकिंग साठी दुप्पट दंड टाळण्यासाठी आज शेवटचा दिवस)
जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी -
1 जुलै: कांग (रथजत्रा) / रथयात्रा - भुवनेश्वर आणि इंफाळमध्ये बँका बंद
3 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
5 जुलै 2022 - मंगळवार - गुरु हरगोविंदांचा प्रकाश दिवस - जम्मू आणि काश्मीर
6 जुलै 2022 - बुधवार - MHIP दिवस - मिझोरम
7 जुलै : खारची पूजा - आगरतळ्यात बँका बंद
9 जुलै: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), ईद-उल-अधा (बकरीद)
10 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 जुलै: जम्मू आणि श्रीनगरमध्ये एझ-उल-अझा- बँका बंद
13 जुलै: भानू जयंती- गंगटोकमध्ये बँका बंद
14 जुलै: बेन डिएनखलम - शिलाँगमध्ये बँका बंद
16 जुलै: हरेला- डेहराडूनमध्ये बँक बंद
17 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 जुलै: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
24 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 जुलै: केर पूजा- आगरतळामध्ये बँका बंद
31 जुलै: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
अशा प्रकारे तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहून त्यानंतर बंँकेत जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला बँकेच्या कामकाजाच्या दिवशी स्वत:ची कामे पूर्ण करता येतील.