Aadhaar-PAN Linking: पॅन-आधार कार्ड लिंकिंग साठी दुप्पट दंड टाळण्यासाठी आज शेवटचा दिवस
Aadhaar-PAN Linking |(Photo Credits: File Photo)

आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) यांना लिंक करण्याची आज (30 जून) शेवटची मुदत आहे. त्यामुळे तुम्ही जर लिकिंग केले नसेल तर आजच करा कारण उद्यापासून याच प्रक्रियेसाठी हजार रूपये मोजावे लागणार आहेत. नव्या Section 234H of Income Tax Act नुसार, 31 मार्च पर्यंत आधारशी पॅन लिंक न केल्यास  1,000 रूपये पर्यंत दंड आकारला जाईल, परंतु आयटीआर दावा करून आयटीएक्स रिटर्न किंवा आयटीआर भरण्यासाठी असे पॅन कार्ड मार्च 2023 किंवा FY2022-23 पर्यंत आणखी एक वर्ष कार्यरत राहतील.

सध्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. आज  हे काम करून घेतल्यास फक्त 500 रुपये दंड भरावा लागेल. या मुदतीत तुम्ही पॅन-आधार लिंक न केल्यास 1 जुलै 2022 पासून तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल. म्हणजेच पॅन-आधार लिंक केल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. नक्की वाचा: Aadhaar-PAN Details Mismatch: तुमच्या आधार-पॅन कार्डवर नाव आणि जन्मतारीख वेगवेगळी आहे का? पहा, कसे कराल दुरुस्त?

दंड भरून आधार-पॅन लिकिंग कसं कराल?

  •  आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in ला भेट द्या.
  • येथे Quick Links विभागातील लिंक आधार पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा पॅन आणि आधार तपशील तसेच तुमचे नाव आणि मोबाईल नंबर एंटर करा.
  • ‘I validate my Aadhaar details’ वर क्लिक करून Continue या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. तो सबमीट करा. आणि नंतर 'Validate' वर क्लिक करा. दंडाची रक्कम भरल्यानंतर, तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

ऑनलाईन प्रमाणेच तुम्ही घरबसल्या SMS च्या माध्यमातूनही पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करू शकता. यासाठी तुम्हांला UIDAIPAN(12digit Aadhaar number) स्पेस (10 digit PAN Number) या फॉर्मेट मध्ये एक एसएमएस 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठायचा आहे.