![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/07-380x214.jpg)
Bank Locker New Rule: नवीन वर्ष 2023 सुरु झाले आहे. अशा परिस्थितीत बँकेकडून लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी महागाईचा बोजा वाढला आहे. असाच नियम बँक लॉकरशीही (Bank Locker) संबंधित आहे. तुम्ही बँक लॉकर वापरत असाल तर RBI ने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. या नियमांबद्दल जाणून घेऊयात...
अनेक बँका ग्राहकांना सतर्क करण्यासाठी एसएमएस पाठवत आहेत. पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात असे म्हटले आहे की, नवीन लॉकर करार आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू केला जात आहे. यासोबतच ग्राहकांकडून नॉन अॅग्रीमेंटबाबत अपडेट्सही घेतले जात आहेत. हे अपडेट एसएमएस किंवा ईमेलवर देण्याऐवजी तुम्ही बँकेत जाऊन नवीन करार करून घेऊ शकता. (हेही वाचा - New Rules in 2023: क्रेडीट कार्ड, बँक लॉकर, आधार-पॅन लिंक यांसह अनेक नियमांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून महत्त्वाचे बदल, घ्या जाणून)
1 जानेवारी 2023 पासून नवीन लॉकर करार -
जर तुम्ही बँक लॉकर भाड्याने घेतले असेल किंवा बँक लॉकर वापरण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला बँक लॉकरच्या या नवीन नियमाची माहिती असणे आवश्यक आहे. आरबीआयने 8 ऑगस्ट रोजीच याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार ग्राहकांच्या कोणत्याही वस्तूचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी बँकांची असेल. यासोबतच ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. यासोबतच लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती ग्राहकांना एसएमएस आणि इतर माध्यमातून द्यावी लागणार आहे.
बँकेला द्यावी लागेल नुकसान भरपाई -
नवीन नियमानुसार, जर काही नुकसान झाले तर ही जबाबदारी थेट बँकेची असेल. बँकेला ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. बँक कर्मचाऱ्याच्या फसवणुकीमुळे नुकसान झाल्यास लॉकरच्या 100 पट भाडे बँकेला भरावे लागेल. तथापि, लॉकर नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्यथा प्रभावित झाल्यास, बँक नुकसान भरपाईसाठी जबाबदार राहणार नाही.
नॉमिनीला सुविधा मिळेल -
लॉकरची सुविधा घेणार्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, नवीन करारानुसार, नॉमिनीला लॉकरची सुविधा दिली जाईल. जर त्याला हे लॉकर पुढे ठेवायचे असेल तर त्याला बँकेशी संपर्क साधावा लागेल.