Aadhaar-Pan Linking: आधार-पॅन लिंकिंगच नव्हे तर ITR filing, Advance Tax Payment यांसह अनेक कामे करा 31 मार्च पूर्वी, नाहीतर बसेल मोठाच फटका, घ्या जाणून
Aadhaar-Pan | (Photo Credits: Archived, edited)

आधार आणि पॅन (PAN-Aadhaar linking) तुम्ही जर लिंक केले नसेल तर ते त्वरीत करा. कारण आधार (Aadhaar) आणि पॅन (PAN) लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 रोजी संपत आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या 12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांकासह लिंक केले नाही तर 31 मार्च 2023 पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. 31 मार्चला आणखीही एक महत्त्व आहे. कारण या दिवशी आर्थिक वर्ष 2023 सुद्धा संपत आहे. त्यामुळे आयकर रिटर्न (ITR) भरणे, आगाऊ कर भरणे (Advance Tax Payment ) आणि कर बचत (Tax Saving), गुंतवणूक (Investments) यासारखी इतर अनेक आर्थिक कामे सुद्धा तुम्हाला 31 मार्च पूर्वीच करायची आहेत. तुम्हाला माहिती आहे का आगाऊ कर तुम्हाला लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे. कारण, त्याची मुदत 15 मार्च 2023 रोजी संपत आहे.

येथे आम्ही शीर्ष 5 पैशांची कार्ये सूचीबद्ध करतो जी तुम्ही दिलेल्या मुदतीसह मार्च 2023 मध्ये पूर्ण करावीत:

पॅन-आधार लिंक (PAN-Aadhaar link)

आधार पॅन लिंक करण्याची मुदत वारंवार वाढवून देण्यात आलीआहे. शिवाय आयकर विभागाने दोन महत्त्वाच्या केवायसी कागदपत्र अपडेट करण्यासठी 31 मार्च 2023 ही मुदत नव्याने वाढवून दिली. आयकर विभागाने आता म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी 31 मार्च 2023 पूर्वी संलग्न झाले नसेल. तर संबंधितांचे पॅन 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होईल. तसेच, ते पुन्हा सुरु आणि संलग्न करायचे असेल तर त्यासाठी 1,000 रुपये इतके शुल्क लागेल.

ITR अद्ययावत आणि जमा करणे (Submission of updated ITR)

आर्थिक वर्ष 2019/20 आणि 2020/21 साठी तुम्हाला जर अद्ययावत आयटीआर जमा करायचे असेल तर त्याचीही मुदत 31 मार्च 2023 आहे. करदात्यांनी लक्षात घ्यायचे आहे की, या सर्व गोष्टी तुम्हाला विहीत काळातच करायच्या आहेत. अन्यथा तुम्हाला आयटीआर अपडेट करता येणार नाही. त्यासाठी अंतिम मुदत 31 मारप्च 2023 आहे. (हेही वाचा, EPFO Balance By Missed Call: 'या' नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक; वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)

आगाऊ कर भरणा (Advance Tax Payment)

प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2023 साठी शेवटचा हप्ता दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत जमा करणे आवश्य आहे. प्राप्तिकर कायदा सांगतो की, जर एखाद्या व्यक्तीचे अंदाजित करदायित्व 10,000 रुपये किंवा किंवा त्याहून अधिक स्रोतावरील कर वजावट (TDS) असेल तर त्याला आगाऊ कर भरणे आवश्यक आहे.

करबचतीची गुंतवणूक ( Tax saving investment): दरम्यान, एखाद्या कमावत्या व्यक्तीचेच आर्थिक उत्पन्न आयकर विभागाने ठरवून दिलेल्या स्लॅबमधील मूळ उत्पन्नापेक्षाही अधिक असेल तर त्यांनी वेळीच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), ELSS म्युच्युअल फंड, कर यासारखे गुंतवणुकीचे मार्ग निवडणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण एखाद्या बँकेत एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटही करु शकता.