Most Polluted City In Asia: ऑक्टोबर संपायला आठवडा उरला असून, गुलाबी थंडीही पडू लागली आहे. त्यामुळे प्रदूषणाची (Pollution) पातळी वाढू लागली आहे. भारतातील अनेक शहरांची हवा खराब आहे. आशियातील 10 प्रदूषित शहरांपैकी (Asia Polluted Cities)भारतातील 8 शहरांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत दिल्ली शहराचा समावेश नसून एनसीआरमधील शहरे आहेत.
जागतिक वायु गुणवत्ता निर्देशांकाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार आशियातील टॉप 10 प्रदूषित शहरांपैकी 8 भारतातील आहेत. त्याच वेळी, आंध्र प्रदेशच्या राजमहेंद्रवरमने सर्वोत्तम हवेच्या गुणवत्तेसह टॉप 10 शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. सर्वात प्रदूषित शहराबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीला लागून असलेले गुरुग्राम हे सर्वात प्रदूषित शहर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत दिल्लीचा समावेश नाही. (हेही वाचा - Multi-Stage Cycle Race: जगप्रसिद्ध Tour De France च्या धर्तीवर दिल्ली-पुणे दरम्यान होणार बहुस्तरीय सायकल शर्यत; जाणून घ्या सविस्तर)
भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे -
जागतिक वायु गुणवत्ता निर्देशांकावर उपलब्ध असलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आशियातील टॉप 10 सर्वात खराब हवेच्या गुणवत्तेच्या स्थानकांच्या यादीत भारतातील 8 शहरे समाविष्ट आहेत. त्यात नंबर एकला गुरुग्रामचा समावेश आहे. टॉप, त्यानंतर रेवाडी (AQI 543) आणि मुझफ्फरपूर जवळील धरुहेरा शहर (AQI 316) या शहरांचा नंबर लागतो.
दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील तालकटोरा (298 AQI), बेगुसरायचे DRCC आनंदपूर (269 AQI), देवासचे भोपाळ स्क्वेअर (266 AQI), कल्याणचे खडापाडा (256 AQI), दर्शन नगर आणि गुजरातमधील छप्रा (239 AQI) या शहरांचा समावेश आहे. या भारतीय शहरांव्यतिरिक्त, चीनमधील लुझोउ येथील झियाओशिशांग पोर्ट (262 AQI) आणि मंगोलियातील उलानबाटा येथील बायनखोशू शहर देखील सर्वात खराब हवेची गुणवत्ता असलेल्या शहरांमध्ये आहेत.
CPCB नुसार, 0 ते 50 मधील AQI सर्वोत्कृष्ट मानला जातो आणि 51 ते 100 कोणत्याही क्षेत्रामध्ये समाधानकारक श्रेणीत असतो. त्याचप्रमाणे 101 ते 200 चा AQI मध्यम मानला जातो, 201 ते 300 खराब मानला जातो आणि 301 ते 400 खूप खराब मानला जातो. याशिवाय, 401 ते 500 दरम्यानचा AQI गंभीर श्रेणीमध्ये मानला जातो. त्यात श्वास घेणेही कठीण झाले आहे.