BrahMos missile (फोटो सौजन्य - PTI)

भारत आणि फिलीपिन्स (Philippines) आज म्हणजेच 28 जानेवारी रोजी ब्रह्मोस क्षेपणास्त्र (BrahMos Missile) कराराला अंतिम रूप देण्यास तयार आहेत. फिलिपाइन्सच्या नौदलासाठी सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी दोन्ही देश 375 दशलक्ष यूएस डॉलरच्या करारावर स्वाक्षरी करतील. यावेळी फिलीपिन्सचे सर्वोच्च संरक्षण अधिकारी उपस्थित राहणार आहेत, तर भारताचे प्रतिनिधीत्व राजदूत करणार आहेत. अलीकडेच, फिलीपिन्सने सुमारे 37.49 करोड डॉलर (रु. 27.89 अब्ज) किमतीचा करार मंजूर केला होता.

क्विझॉन शहरातील फिलीपिन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागामध्ये आयोजित कार्यक्रमात हा करार केला जाईल. फिलिपाइन्सचे संरक्षण सचिव डेल्फीन लोरेन्झाना या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. (वाचा - पाच कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात; UN ने व्यक्त केली चिंता, जाणून घ्या कारण)

भारत सरकारला आत्मनिर्भर बनायचे असून संरक्षण उपकरणांच्या व्यवसायात परिस्थिती सुधारायची आहे. या हालचालीमुळे भारताचा प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातक होण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळेल. यामुळे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेली क्षेपणास्त्रे घेण्याचा आग्नेय आशियाई देशांना मार्गही मोकळा होऊ शकतो.

दरम्यान, 14 जानेवारी रोजी फिलिपाइन्सने आपल्या नौदलासाठी किनाऱ्यावर तैनात केल्या जाणाऱ्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यासाठी ब्रह्मोस एरोस्पेससोबत 37.4 करोड डॉलरचा करार केला होता.

चीनला मोठा धक्का -

हा संरक्षण करार चीनसाठी योग्य मानला जात नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्सचा चीनसोबत वाद आहे. ब्राह्मोसचा किनाऱ्यावर आधारित जहाजविरोधी क्षेपणास्त्र म्हणून वापर करण्याचा फिलीपीन मरीनचा मानस आहे. दक्षिण चीन समुद्र हे संभाव्य क्षेत्रांपैकी एक आहे जेथे यंत्रणा तैनात केली जाऊ शकते.

या करारत तीन बॅटऱ्यांची डिलिव्हरी, ऑपरेटर आणि मेंटेनरसाठी प्रशिक्षण आणि एकात्मिक लॉजिस्टिक सपोर्ट (ILS) पॅकेजचा समावेश आहे. BrahMos साठी कराराची कल्पना 2017 मध्ये झाली होती आणि फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने 2020 मध्ये लष्कराच्या Horizon 2 Priority Projects मध्ये त्याचा समावेश करण्यास मान्यता दिली होती.

ब्रह्मोस खरेदी करणारा पहिला देश

ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणारा फिलिपिन्स हा पहिला देश बनणार आहे. 2021 च्या सुरुवातीला राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या प्रस्तावित भेटीदरम्यान दोन्ही बाजूने या करारावर स्वाक्षऱ्या होणार होत्या. परंतु, COVID-19 साथीच्या आजारामुळे ही योजना अयशस्वी झाली.