Photo Credit- X

HMPV in Gujarat: भारतात एचएमपीव्ही (HMPV Virus) च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुजरातमधील साबरकांठा(Sabarkantha) येथे एका आठ वर्षांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत एकट्या गुजरातमध्ये (HMPV Case in Gujarat) तीन रुग्णांची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संक्रमित मुलगा प्रांतीज तालुक्यातील एका शेतमजूर कुटुंबातील आहे. अलिकडेच एका खाजगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत त्याची चाचणी करण्यात आली. जिथे त्याला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळले.

यानंतर, आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत पाठवले.सध्या मुलावर उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती स्थिर आहे. गुजरातमध्ये एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण 6 जानेवारी रोजी आढळला. मुळचे राजस्थानचा असलेल्या दोन महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळले. रुग्णालयात उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. (HMPV Virus in India: कर्नाटक आणि गुजरातपाठोपाठ तामिळनाडूच्या चेन्नई आणि सालेममध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचे आढळले दोन रुग्ण)

गुरुवारी, अहमदाबादमध्ये एका 80 वर्षीय वृद्धाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळून आले. देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. राज्यांना याबाबत सतत देखरेख आणि दक्षता ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला यांनी देशातील श्वसन रोगांचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेतला. (HMPV Virus च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन चा खोटा दावा वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा)

आरोग्य मंत्रालयाने लोकांना या संसर्गाबद्दल घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. एचएमपीव्ही संसर्गाचा पहिल्यांदा 2001 मध्ये शोध लागला. हा विषाणू श्वसन संवेदी विषाणू (RSV) शी संबंधित आहे. खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या विषांणूंद्वारे तो पसरतो. संक्रमित व्यक्तीला स्पर्श केल्याने किंवा संक्रमित व्यक्तींच्या थेट संपर्कात आल्याने देखील हा संसर्ग पसरू शकतो.