आज अभियंता दिनाच्या (Engineer's Day) निमित्ताने सोशल मीडियावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही ट्वीटरच्या मध्यमातून अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नेहमी विज्ञानाचे कौतुक करताना दिसतात. विज्ञान हे मानवी जीवनात महत्वाची भुमिका बजावत असतो, असे त्यांच्याकडून अनेकदा सांगितले जाते. जगभरात वेगवेगळ्या तारखेला अभियंता दिन साजरा केला जातो.
भारतात अभियंता दिन हा 15 सप्टेंबरला साजरा होतो. 15 सप्टेंबर हा प्रसिद्ध अभियंते आणि राजकीय व्यक्तिमत्व होते मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या (Mokshagundam Visvesvaraya) यांचा जन्मदिवस आहे. विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले. तसेच, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्म दिन हा अभियंता दिन (Engineer's Day) म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
अभियंता दिनाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तसेच फेसबूक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि इतर माध्यमातून अभियंता दिनाचे महत्व सांगितले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुप्रिया सुळे (Supriya Sule), चित्रा वाघ(Chitra Wagh), राजनाथ सिंह यांनीही अभियंता दिनाच्या शुभेच्छा देऊन अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. हे देखील वाचा Engineer's Day 2019: जाणून घ्या जगभरात कोणत्या देशात किती तारखेला साजरा करतात अभियंता दिन?
Engineers are synonymous with diligence and determination. Human progress would be incomplete without their innovative zeal. Greetings on #EngineersDay and best wishes to all hardworking engineers. Tributes to the exemplary engineer Sir M. Visvesvaraya on his birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2019
#ThankYou all Engineers on the Birthday of Bharat Ratna M. Visvesvaraya, for making our Life easy.#EngineersDay #Respect pic.twitter.com/0D9RVfDi6C
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 15, 2019
Science is about knowing; engineering is about doing.”
— Henry Petroski.
Best Wishes and Greetings on
Remembering Bharat Ratna - Late Shri Mokshagundam Visvesvaraya on his birth anniversary.
— Supriya Sule (@supriya_sule) September 15, 2019
My tributes to the Engineer par excellence, Sir M. Visvesvaraya on his jayanti which is observed as the ‘Engineers Day’ in India.
I extend my greetings and good wishes to all the engineers of the country who are truly the embodiment of the spirit of ‘Building a New India’.
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 15, 2019
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांची थोडक्यात माहिती
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्ह्यात एका तेलुगु कुटुंबात झाला. मोक्षगुंडम यांच्या वडीलांचे नाव श्रीनिवास शास्त्री तर आईचे नाव वेंकाचम्मा असे होते. त्यांचे वडील संस्कृत विषयाचे तज्ज्ञ होते. विश्वेश्वरैया यांनी आपले प्रारंभीक शिक्षण आपल्या जन्मगावीच पूर्ण केले. मात्र, पुढील शिक्षणासाठी त्यांना बेंगलुरु येथील सेंट्रल काँलेज जावे लागले. आर्थिक टंचाईमुळे त्यांना आपल्या शिक्षणात संघर्ष करावा लागला. शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी विश्वेश्वरयां यांनी खासगी शिकवणी घेणे सुरु केले. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया 1881 बीए परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मैसूर सरकारने उचलली. त्यांनी पुणे येथील सायन्स महाविद्यालयामधून अभियात्रिकी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. इथेही ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे गुण आणि कौशल्य पाहून सरकारने त्यांना नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर सेवेत दाखल करुन घेतले.
स्वतंत्र्यपूर्व भारतात कृष्ण सागर धरण, भद्रावती आयरन अँण्ड स्टील वर्क्स, मैसूर सैंडल ऑयल अँण्ड सोप फॅक्ट्री, मैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणं ही विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची पावती ठरली. त्यांचे कार्य पाहून त्यांना कर्नाटकच्या विकासाचा भागीरत म्हणूनही ओळखले जाते.