DJ operator | Representational image (Photo Credits: pxhere)

Bihar Shocker:  बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील औद्योगिक नगर पोलिस स्टेशन परिसरात हायव्होल्टेज विजेच्या तारेचा धक्का लागून कवाड यात्रे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सुलतानपूर गावात घडली आहे. ट्रॉलीमध्ये डीजे घेऊ जात असताना 11 हजार व्होल्टची वायर माईकच्या संपर्कात आली असवी त्यामुळे विजेचा धक्का लागला अशी भीती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा-  कौटुंबिक कार्यक्रमात नाचताना ह्रदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या तारेचा धक्का लागून आठ जणांचा मृत्यू झाला तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले. पोलिस उपअधीक्षक ओम प्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व मृत हे सुलतानपूर गावचे रहिवासी आहेत. श्रावण महिन्यात दर रविवारी ते ४ ऑगस्टला निघाले. आणि रात्री १२ वाजता गंगाजल भरण्यासाठी आणि हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी सर्वजण जात होते. त्यानंतर ही घटना घडली. घटनेनंतर गावात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांनी या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ वीज कार्यालयाला फोन करण्यात आला मात्र कोणीही फोन उचलला नाही. असा आरोप स्थानिकांनी केला आहे.पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.  11,000 व्होल्टच्या लाईनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन हा घात घडला. सर्व मृतक एकाच गावातील रहिवासी होते. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.