Sudden Death in Rajasthan: कौटुंबित कार्यक्रमात नाचताना एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना राजस्थान येथील भैंसलाना गावात घडली. मन्ना लाल जाखड असं मृताचे नाव आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मन्ना हे कार्यक्रमात नाचताना दिसत आहे. अचानक नाचता, नाचता ते जमिनीवर कोसळले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मन्ना हे जोधपूर येथील सराकरी शाळेत शिक्षक म्हणून कामाला होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा- क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद)
एक और नाचते-चलते-मौत LIVE
राजस्थान में अपने बड़े भाई के रिटायरमेंट के मौक़े पर हो रहे समारोह में नाचते हुए शख़्स की हार्ट अटैक से मौत।
ऐसी मौत बेहद आम सी लगने लगी है। इसे रोकने के लिए मेडिकल साइंस कुछ करे।
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)