खुशखबर! भारतीय लष्करात धार्मिक शिक्षकांची नोकरभरती; जाणून घ्या पदे, महत्वाच्या तारखा व इतर माहिती
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

भारतीय लष्कराने (Indian Army) कनिष्ठ आयुक्त अधिकारी म्हणून धार्मिक शिक्षकांच्या (Religious Teachers) भरतीसाठी पात्र पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. पंडित, ग्रंथी, पाद्री आणि मौलवी (सुन्नी) प्रवर्गासाठी कनिष्ठ आयुक्त अधिकारी (धार्मिक शिक्षक) यांची नोंदणी प्रक्रिया joinindianarmy.nic.in वर ऑनलाईन घेण्यात येईल. अधिकृत अधिसूचनेनुसार, धार्मिक शिक्षक एकदा त्यांची भरती झाल्यावर, सैन्य दलांना धार्मिक शास्त्रांची माहिती सांगतील आणि रेजिमेंटल किंवा युनिट धार्मिक संस्थांमध्ये विविध धार्मिक विधी करतील. भारतीय सैन्याच्या या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी 30 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल.

धार्मिक शिक्षकांच्या कामाच्या स्वरूपामध्ये अंत्यसंस्कारात सहभागी होणे, रूग्णालयात रूग्णांची सेवा करणे, सैनिकांसमवेत प्रार्थना करणे, शिक्षा भोगणा सैनिकांची भेट घेणे, मुलांना खास धार्मिक सूचना, माहिती देणे तसेच इतर धार्मिक कार्यात सहभागी होणे यांचा समावेश असेल. पात्र असलेल्या उमेदवारांना प्रारंभिक तपासणीसाठी प्रवेश पत्र दिले जाईल. त्याआधी उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्र तपासणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी व त्यानंतर संबंधित मुख्यालय भर्ती विभाग किंवा संबंधित रेजिमेंटल सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल.

या उमेदवारांची 23 फेब्रुवारी, 2020 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल. सेवा उमेदवार त्यांच्या पोस्टिंगच्या जवळील रिक्रूटिंग झोन किंवा इंडिपेंडंट रिक्रूटिंग ऑफिस (दिल्ली कॅंट) मध्ये स्क्रिनिंग आणि लेखी परीक्षेस बसतील. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आणि पेपर 1- सामान्य जागरूकता आणि पेपर 2 - धार्मिक संप्रदायाशी संबंधित असे दोन पेपर्स असतील. (हेही वाचा: खुशखबर! सरकारी बँकांमध्ये तब्बल 12,899 पदांसाठी नोकर भरती; जाणून घ्या बँकांची नावे, कुठे कराल अर्ज आणि इतर माहिती)

पदांची संख्या -

पंडित - 118, पंडित (गुरखा) - 7,  ग्रंथी- 9, मौलवी (सुन्नी) - 9, लडाखसाठी मौलवी (शिया) - 1, पाद्री- 4, लडाख स्काउटसाठी बौद्ध भिक्षू (महायान) – 4 पदे

शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेत पदवीधर, याव्यतिरिक्त भारतीय सैन्याने अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवाराची त्यांच्या धार्मिक संप्रदायानुसार पात्रता असणे आवश्यक आहे.

एकाच उमेदवाराकडून अनेक अर्ज मिळाल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.