प्रतिकात्मक फोटो (File Photo)

सरकारी नोकरीच्या (Government Bank Job) शोधात असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या अनेक महत्वाच्या सरकारी बँकांमध्ये नोकर भरती (Jobs Recruitment) सुरु झाली आहे. ज्या बँकांमध्ये ही रिक्त पदे आहेत त्यामध्ये आयबीपीएस (IBPS), एसबीआय (SBI) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांचा समावेश आहे. आयबीपीएस मध्ये 12 हजार लिपिक पदासाठी नोकर भरती सुरु झाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवातही झाली आहे. भारतीय स्टेट बँक मध्ये 700 पदांसाठी भरती आहे,  तर आरबीआयमध्ये Grade B साठी 199 पदांसाठी भरती सुरु आहे.

आयबीपीएस -

आयबीपीएस लिपिक भरतीसाठी 12 हजार पदांसाठी (आयबीपीएस लिपिक नोंदणी) नोंदणी सुरू झाली आहे. उमेदवार Www.ibps.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. याद्वारे होणाऱ्या भरतीनंतर आंध्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युको बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, अलाहाबाद बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक इंडियन बँक, पंजाब अँड सिंद बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया अशा बँकांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळू शकते. (हेही वाचा: LIC Recruitment 2019: एलआयसी मध्ये 8 हजार पदांसाठी मेगा भरती; पहा कुठे आणि कसा कराल अर्ज)

एसबीआय -

एसबीआयमध्ये 700 अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2019 आहे तर  Sbi.co.in/ Career या संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

एसबीआयने प्रसिद्ध केलेली अधिकृत सूचना इथे पहा

आरबीआय - 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ग्रेड बी (DR) अधिकारी पदासाठी 199 पदांसाठी नोकर भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर आहे. उमेदवार Rbi.org.in या संकेतस्वथळावर अर्ज करू शकतात.

आरबीआयने प्रसिद्ध केलेली अधिकृत सूचना इथे पहा