NEET UG 2024 Admit Card Released:  NTA कडून नीट यूजी 2024 परीक्षेचं हॉलतिकीट जारी; neet.nta.nic.in वरून असं करा डाऊनलोड
NEET | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

National Testing Agency कडून NEET UG 2024 परीक्षेसाठी हॉलतिकिट जारी करण्यात आले आहे. ही परिक्षा 5 मे दिवशी होणार असून देशात विविध राज्यांमध्ये आणि जगात 14 शहरांमध्ये पेन आणि पेपर मोड मध्ये होणार आहे. या परीक्षेचं आयोजन दुपारी 2 ते संध्याकाळी 5.20 या वेळेत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांची हॉलतिकीट्स neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. यंदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता यावं यासाठी रजिस्ट्रेशन विंडो पुन्हा 10 एप्रिल पर्यंत खुली ठेवली होती.

नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) नुसार, ज्या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्डांमधून 12 वी पास झाल्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञानाचा अतिरिक्त विषय म्हणून इंग्रजीसह अभ्यास केला आहे, ते NEET-UG साठी बसण्यास पात्र आहेत. exams.nta.ac.in आणि neet.ntaonline.in या संकेतस्थळावरून अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येऊ शकतात.

NEET UG 2024 Admit Card कसं कराल डाऊनलोड?

NEET UG ची अधिकृत वेबसाईट exams.nta.ac.in किंवा neet.ntaonline.in.ला भेट द्या.

आता होमपेजवर नीट परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी लिंक पहा.

अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर, पासवर्ड किंवा जन्मतारीख आणि सिक्युरिटी कोड (जो स्क्रिन वर दिसत असेल) तो भरा.

आता अ‍ॅडमीट कार्डवरील सारे तपशील तपासून घ्या. ज्यामध्ये एक्झाम सएंटर, वेळ, खाजगी माहिती यांचा समावेश असेल. जर त्यामध्ये काही चूक असेल तर हेल्प डेस्कची मदत घ्या.

आता अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करा.

(नक्की वाचा: Father Cracked NEET With Daughter: प्रेरणादायी! 18 वर्षांची मुलगी आणि 50 वर्षांच्या डॉक्टर वडीलांनी एकत्र पास केली NEET परीक्षा) .

नीट परीक्षेच्या अ‍ॅडमीट कार्ड डाउनलोड प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्यास, उमेदवार NTA हेल्पलाइनवर (011-40759000) वर संपर्क साधू शकतात किंवा मदतीसाठी neet@nta.ac.in वर ईमेल करू शकतात. NEET UG 2024 ची परीक्षा भारतातील 571 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, ओडिया, कन्नड, पंजाबी, उर्दू, मल्याळम, मराठी, तेलगू आणि तामिळ यासह अनेक भाषांमध्ये उत्तरासाठी माध्यम दिले जाते. NEET UG 2024 परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे, जी या देशव्यापी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे महत्त्व दर्शवते.