Father Cracked NEET With Daughter: वय 50 वर्षे. पेशाने डॉक्टर. दिवसभर रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त. मात्र असं असूनही एका व्यक्तीने वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) क्रॅक केली. मुलीला प्रेरणा मिळावी, हा यामागील उद्देश. विशेष वडिलांसोबतच मुलीनेही NEET परीक्षा उत्तीर्ण केली. डॉक्टर वडील आणि मुलीने मिळून NEET परीक्षा उत्तीर्ण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील आहे. आपल्या मुलीच्या यशासाठी वडिलांनी उचललेले हे अनोखे पाऊल संपूर्ण यूपीमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रकाश खेतान हे प्रयागराजचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. प्रकाश खेतान यांची 18 वर्षांची मुलगी मिताली हिलाही त्यांच्याप्रमाणेच डॉक्टर बनायचे आहे. डॉक्टर वडिलांनी आपल्या मुलीला वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) उत्तीर्ण होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा -Jharkhand: बाप असावा तर असा! सासरच्या मंडळीकडून मुलीचा छळ; वडिलांनी बँड आणि फटाक्यांची आतषबाजी करत आणलं मुलीला परत)
आपल्या मुलीला प्रवृत्त करण्यासाठी डॉ. प्रकाश खेतान यांनी ठरवले की, ते स्वतःही फॉर्म भरतील. त्यांनी वयाच्या 50 वर्षी NEET साठी अर्ज केला. त्यांनी अनेक दशकांनंतर पुन्हा वैद्यकीय पुस्तके वाचली.
दरम्यान, प्रयागराज येथील या पिता-पुत्रीने एकत्र NEET साठी तयारी केली. NEET परीक्षेबाबतही ते एकमेकांशी चर्चा करत राहिले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या केंद्रांवर NEET परीक्षा दिली. निकाल लागला तेव्हा मुलगी मिताली हिला 90% पेक्षा जास्त गुण मिळाले तर डॉ प्रकाश खेतान यांना 89 % गुण मिळाले.