
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून अखेर बारावी निकालाच्या तारखेची (Maharashtra Board HSC Results) घोषणा केली आहे. राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये घेण्यात आलेल्या बारवीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 5 मे दिवशी mahresult.nic.in, आणि results.digilocker.gov.in सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आईचं नाव आणि रोल नंबर टाकावा लागणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअर कार्ड ऑनलाईन पाहता येईल.
बारावी बोर्ड परीक्षेचा कसा पहाल निकाल?
-
- बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.
- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे नाव टाका.
- सबमिट’ बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2025 च्या बारावी परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती . How To Check HSC Result 2025 On SMS: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल SMS च्या माध्यमातून कसा पहाल?
बारावी निकाल 2025 चे अपडेट्स
View this post on InstagramA post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)
बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सार्या विषयांमध्ये किमान 35% गुण आवश्यक आहेत. मागील काही वर्षांचे निकाल पाहता बारावीच्या निकालांत मुलींनी बाजी मारली आहे तर नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभाग अव्वल ठरले आहे. 12वी ची परीक्षा यंदा लवकर झाली असल्याने निकालही लवकर लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. बोर्डाकडून यंदा 15 मे पूर्वी 10वी, 12वी निकाल जाहीर होतील असे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता 5 मे ला 12वीचा निकाल आणि त्यानंतर आठवडाभरात 10वीचे निकाल लागू शकतील.