
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी च्या बोर्ड परीक्षा यंदा लवकर घेण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये आता निकालाची उत्सुकता वाढत आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार सध्या 12वीचा निकाल लावण्याचे काम सुरू आहे. मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामं सुरू झाली आहे. त्यामुळे 15 मे पर्यंत बोर्डाचे निकाल लागण्याचा अंदाज आहे. हा निकाल थेट हातात येण्यापूर्वी ऑनलाईन पाहता येतो. वेबसाईट वर मोबाईल मध्ये SMS च्या माध्यमातून बोर्डाचे निकाल पहाता येऊ शकतात.
मुंबाई राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर जर तुम्हांला तो एसएमएस वर पहायचा असेल तर त्यासाठीही सोय करण्यात आली आहे. अनेकदा वेबसाईट डाऊन असल्याने निकाल पाहण्यात तांट्रिक अडचणी येऊ शकतात. अशावेळी निकाल पाहण्यासाठी SMS चा देखील पर्याय आहे.
Maharashtra HSC Result 2025 मोबाईल वर SMS द्वारा कसा पहाल?
- SMS द्वारा निकाल पाहण्यासाठी MHHSC{SPACE}Seat Number तुम्हांला 57766 वर पाठवावा लागेल.
- आता तुम्ही ज्या नंबर वरून मेसेज पाठवला आहे त्या नंबर वर निकाल एसएमएस च्या माध्यमातून कळवला जाईल.
अद्याप महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडीयातील कोणत्याही फॉर्वर्ड केलेल्या मेसेज विश्वास ठेवू नका. साधारणपणे निकालाच्या आदल्या दिवशी निकालाच्या तारीख, वेळेची माहिती दिली जाते.
निकाल जाहीर झाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यांच्या आत मूळ बारावीची गुणपत्रिका संबंधित शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी अधिकृत पोर्टलवरून त्यांची ई-मार्कशीट आणि उत्तीर्णता प्रमाणपत्र देखील डाउनलोड करता येऊ शकते.