HSC Result 2025 | File Image

MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची (HSC Result) आज (5 मे) घोषणा झाली आहे. शरद गोसावी यांनी निकालाची आकडेवारी दिली आहे. बारावी बोर्ड परीक्षेचा राज्याचा निकाल 91.88 % लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 1.49% निकाल कमी लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 % लागला आहे. यंदा देखील बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारलेली पहायला मिळाली आहे. सर्वात कमी निकाल लातुर विभागीय मंडळाचा लागला आहे. दरम्यान बोर्डाकडून कोणतीही टॉपर्स लिस्ट जारी केली जात नाही. विद्यार्थ्यांना उद्या 6 मे पासून गुणपत्रिका शाळा, कॉलेज मध्ये मिळणार आहे.  आकाडेवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर पाहता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत, पालकांची उत्सुकता देखील शिगेला पोहचली आहे. काही तासांतच ही प्रतिक्षा संपणार आहे.  MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल? 

बारावीचा निकाल शाखानिहाय पहा किती?

सायन्स 97.35%

आर्ट्स 80.52%

कॉमर्स 96.68%

व्यवसाय अभ्याक्रम 93.26%

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 91.88%

बोर्डाने आता केवळ निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये विभागनुसार आणि शाखेनुसार आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयानुसार मार्क्स दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहेत. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचं नाव अचूक टाकावं लागणार आहे. Maharashtra HSC Board Results 2025: बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज 1 वाजता होणार जाहीर; hscresult.mahahsscboard.in सह कोणत्या साईट्स वर पाहू शकाल मार्क्स.

यंदा 15 मे पूर्वी 10वी, 12वीचे निकाल जाहीर करणार असल्याचे बोर्डाने सांगितले होते. त्यानुसार आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे तर आठवडाभरामध्ये 10वीचा निकाल जाहीर होणार आहे.