
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) आज बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता आर्ट्स, कॉमर्स, सायंस सह व्होकेशनल कोर्सेसेच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ऑनलाइन पाहता येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट https://hscresult.mahahsscboard.in/ सोबतच अन्य थर्ड पार्टी वेबसाईट वरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
आज बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आईचं नाव आणि रोल नंबर हे तपशील टाकावे लागणार आहेत.दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी 11 वाजता बारावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. नक्की वाचा: MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल?
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईट्स वर पहाल?
results.targetpublications.org
www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली आहे. या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये 8,10,348 मुले, 6,94,652 मुली व 37 ट्रान्सजेंडर आहेत. एकूण 10550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी 3373 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
आज निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही निकालावर नाखूष असाल तर गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळवण्यासाठी 6 मे ते 20 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.