DigiLocker (PC - google play)

Maharashtra Board HSC Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)  कडून 5 मे दिवशी बारावीचा बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स hscresult.mahahsscboard.in, mahresult.nic.in वर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निहाय गुण आणि एकूण टक्केवारी या ऑनलाईन निकालामध्ये पाहता येणार आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी सुमारे 9 विविध वेबसाईट्स खुल्या ठेवल्या आहेत. पण तुम्हांला निकाल ऑफलाईन स्वरूपात पहायचा असेल तर SMS चा देखील पर्याय आहे. DigiLocker च्या माध्यमातूनही निकाल पाहण्याची सोय आहे. Maharashtra Board HSC Results 2025: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 5 मे दिवशी 1 वाजता होणार जाहीर; mahresult.nic.in वर पहा मार्क्स .

कसा पहाल बारावी परीक्षेचा निकाल SMS च्या माध्यमातून?

  • तुमच्या स्मार्टफोन मध्ये मेसेजिंग अ‍ॅप सुरू करा.
  • MHHSC(SPACE)सीट नंबर/रोल नंबर टाका.
  • हा मेसेज 57766 वर पाठवा.
  • काही मिनिटांतच, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल एसएमएस अलर्ट म्हणून पाठवला जाईल.
  • त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता.

DigiLocker च्या माध्यमातून कसा पहाल बारावीचा निकाल?

  • DigiLocker App ओपन करा आणि त्यामध्ये तुमचं युजरनेम / पासवर्ड टाका.
  • नोंदणी करण्यासाठी (जर आवश्यक असेल किंवा विचारले असेल तर) तुमचे आधार कार्ड लिंक करायला विसरू नका.
  • डिजिलॉकर वर तुमचं अकाऊंट असेल तर साईन इन करा. पहिल्यांदाच अ‍ॅप वापरत असाल तर नव्या अकाऊंट साठी साईन अप करा.
  • ‘Result’ विभागात जा.‘Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education’ लिंकवर क्लिक करा.
  • निकाल पाहण्यासाठी, तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील टाका. डाउनलोड वर क्लिक करा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 2025 स्क्रीनवर दिसेल.

तुमच्या अपेक्षेनुसार निकाल नसेल तर विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन आणि उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी घेण्यासाठी 6 मे ते 20 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.