![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/JNU2-380x214.jpg)
JNU Student Protest: राजधानी दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University)सध्या देशभर गाजत आहे. जगभरातील शैक्षणिक वर्तुळ आणि विविध आंदोलनांचा अभ्यास करणाऱ्या संस्था, अभ्यासकांचेही जेएनयू (JNU) मध्ये सुरु उसलेल्या विद्यार्थी आंदोलनाकडे (JNU Protest) लक्ष आहे. विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशास यांच्यातील हा संघर्ष इतका टोकाला गेला आहे की, अखेर हस्तक्षेप करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही त्यांची मर्दुमकी दाखवत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. तरीही हे विद्यार्थी मागे हटायला तयार नाहीत. जेएनयू विद्यार्थी (JNU Student) आपल्या मागणीवर ठाम आहेत. नेमका काय आहे हा वाद. विद्यार्थी का पेटलेत इतके इरेला. आक्रमक विद्यार्थ्यांना देशभरातून का मिळतोय पाठिंबा. घ्या जाणून.
नेमका काय आहे वाद?
जेएनयू प्रशासनाने एक नोव्हेंबर या तारखेला एक पत्रक जारी केले. या पत्रात विद्यापीठ प्रशासनाने म्हटले होते की, विद्यार्थी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह शुल्क वाढविण्यात येत आहे. या वाढीव शुल्कामध्ये वसतीगृहातील खोली भाडे ते वीज, पाणी आणि मेंटेनन्स आदी गोष्टींचा समावेश आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार विद्यापीठ परिसरात असलेल्या दोन वसतीगृहात राहणारे विद्यार्थी खोलीभाडे, पाणी, आणि विजबिल देत आहेत. मात्र, इतर 16 वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मेंटेनन्स शुल्क द्यावे लागत नव्हते.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/JNU1.jpg)
जेएनयू रजिस्ट्रार यांच्यावतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात मेंटेनन्सवर प्रतिवर्ष 10 कोटी रुपये खर्च केले जातात. देशातील इतर विद्यापीठांप्रमाणे इथलेही सर्व विद्यार्थ्यांना खर्चानुसार वीज, पाणी आणि इतर सेवा शुल्क (सॅनिटेशन, मेंटेनन्स, भोजन, स्वयंपाक मदतनीस इत्यादी) भरावे लागेल. या शुल्कापोटी विद्यापीठाने आकारलेली रक्कम तब्बल 1700 रुपये प्रतिमहीना इतकीआहे.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/EJrJ32cUEAAu3ib-1.jpg)
प्राप्त माहितीनुसार, जेएनयू प्रशासनाने हे शुल्क वाढवत असताना विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा केली नव्हती. विद्यापीठ प्रशासनाने अचानक वाढवलेल्या शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना आवडली नाही. परिणामी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. विद्यापीठ प्रशासनाने वाढवलेल्या शुल्काविरोधात विद्यार्थी विद्यापीठ परिसरात एडमिन ब्लॉक जवळ आंदोलनास बसले आहेत. (हेही वाचा, JNU निवडणूकीत पुन्हा एकदा 'लाल सलाम'; महाराष्ट्राच्या साकेत मून याची दमदार कामगिरी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पराभूत)
जेएनयू इमारत
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/admin-build-1024x569.jpg)
विद्यार्थ्यांचा पवित्र पाहून विद्यापीठ प्रशासनाने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे शुक्ल कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, आगोदर होते तेवढेच शुल्क कायम ठेवण्यात यावे यावर विद्यार्थी ठाम राहिले. तसेच, त्यांनी आपले आंदोनही आक्रम केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ नको आहे. विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, वसतीगृहातील भोजनासाठी या आधी 2500 रुपये द्यावे लागत होते त्याजागी आता नव्या शुल्कवाढीनुसार 6500 रुपये द्यावे लागणार आहेत.
विद्यापीठाचा 2017-18 मधील वार्षिक अहवाल काय सांगतो?
विद्यापीठाच्या 2017-18 या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, वसतिगृहातील 40 टक्के वद्यार्थ्यांच्या घरची वार्षिक कमाई 12 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या विद्यार्थ्यां विद्यापीठाच्या वतीने 2000 रुपये मासिक अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, या वद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने वाढवलेले शुल्क देणे जिकीरीचे होऊन बसणार आहे. याचाच अर्थ 40 टक्के विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणावर पाणी सोडावे लागेल.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/JUN.jpg)
जेएनयूने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यंची एकूण संख्या 6,349 इतकी आहे. 2017 मध्ये इथे सुमारे 1,556 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यातील 623 विद्यार्थ्यांचे मासिक उत्पन्न 12 हजार रुपयांपेत्राही कमी आहे. जेएनयू मेससाठी (रिफंडेबल) अनामत रक्कम म्हणून आकारण्यात येणारे आगोदरचे शुल्क 5,500 रुपये इतके होते. त्यात वाढ करुन आता ते 12 हजार रुपये करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर त्यातील 5,500 रुपये परत करण्यात आले आहेत. या आधी सॅनिटेशन आणि मेंटेनन्स आदींसाठी शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, आता त्यात प्रतिमहिना 1700 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच, वीज, पाणी यांसाठीही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, आता या विद्यार्थ्यांना हे शुल्क द्यावे लागणार आहे. दरम्यान, या शुल्कामध्ये दारिद्र्यरेशेखालील विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वसतीगृहात ज्या दोन खोल्या दिल्या जात होत्या त्यातही 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
JNU परिसर
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/JNU-campus.jpg)
जेएनयूमध्ये दिल्या जाणाऱ्या वसतीगृहात सिंगल रुमसाठी पहिल्यांदा प्रति विद्यार्थी 20 रुपये इतके शुल्क आकारले जात होते. त्यात वाढ करुन आता ते 600 रुपये इतके करण्यात आले आहे. तर, दारिद्र्यरेशेखालील विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये शुल्कापोटी द्यावे लागणार आहेत. दोन विद्यार्थी मिळून एका खोलीत राहात असतील तर त्यासाठी 10 रुपये इतके शुल्क आकारले जात होते. आता नव्या शुल्कवाढीनुसार त्याठीकाणी 300 रुपये प्रतिमहिना आकारण्यात येतील. मात्र, रॉलबॅकनंतर बीपीएल विद्यार्थ्यांना ते 150 इतके असेन. याशिवाय या विद्यार्थ्यांच्या मेस बिल, एस्टैब्लिश्मन्ट चार्ज आदींमध्येही कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. मात्र, मेसचे वन-टाईम शुल्क दुप्पट करण्यात आले आहे. त्यातील 5500 रुपये विद्यार्थ्यांना परत करण्यात येतील.