Study | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Mental Health During Exams: महाराष्ट्रासह देशभरातील हजारो विद्यार्थी या वर्षी इयत्ता बारावी म्हणजेच एचएससी (HSC) च्या वर्गात प्रवेश घेतील. अनेकांच्या दृष्टीने हे वर्ष बोर्ड परीक्षेचे असल्याने अतिशय महत्त्वाचे असते. बारावी हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून, करिअर निवडीसाठी हा पाया ठरतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक एकाच वेळी अधिकच सजग असतात. खास करुन पालक विद्यार्थ्यांकडून अधिकच्या अपेक्षा ठेवतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांवर इयत्ता 12 वी परीक्षेचा (HSC Board Exams 2025) आणि अभ्यासाचा ताण निर्माण (HSC Study Stress Management) होतो. अशा परिस्थितीत, फक्त अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांना भावनिक व शैक्षणिक आधार देणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे हा ताण हाताळण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी?

इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या पालकांनी विद्यार्थ्यांसाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी? ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण हलका होईल आणि त्यांची अभ्यासातील रुची वाढेल? चला जाणून घेऊया:

घरात शांततेचे वातावरण तयार करा

घरात अनावश्यक गोंगाट, मोठ्याने टीव्ही बघणे किंवा भांडणं टाळा. एक शांत आणि सकारात्मक वातावरण अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यात मदत करतं. (हेही वाचा, HSC Study Techniques for Students: इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सातत्य आणि उत्साह टिकवण्यासाठी काय करावे? घ्या जाणून)

संतुलित अभ्यास वेळापत्रक तयार करा

मुलांना अति अभ्यास किंवा रात्रभर जागरणापेक्षा, वेळेचे व्यवस्थापन शिकवा. छोट्या छोट्या विश्रांतीसह नियोजित अभ्यास अधिक परिणामकारक ठरतो.

झोप व पोषणाकडे लक्ष द्या

सकारात्मक मानसिकतेसाठी शरीर तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. मुलांना पुरेशी झोप (किमान 6–8 तास) मिळणं आणि पोषक आहार देणं गरजेचं आहे. फास्ट फूड व अति कॅफीन टाळा. (हेही वाचा, Maharashtra SSC & HSC Results 2025 Tentative Dates: महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागणार? जाणून घ्या संभाव्य तारखा)

इतरांशी तुलना करू नका

मुलांचं इतर विद्यार्थ्यांशी किंवा नातेवाईकांशी तुलना करणं टाळा. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. प्रोत्साहन व विश्वासाने त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

मुलं गप्प बसणं, चिडचिड होणं, झोप किंवा भुकेच्या सवयींमध्ये बदल – हे मानसिक तणावाची लक्षणं असू शकतात. अशा वेळी संवाद साधा आणि गरज असल्यास समुपदेशकाची मदत घ्या.

परीक्षा संबंधित माहिती ठेवा

परीक्षेच्या तारखा, हॉलतिकीट, परीक्षा केंद्र, आणि बोर्डाचे नियम जाणून ठेवा. वेळेवर तयारी होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

लहान यशाचाही सन्मान करा

मुलाने एखादा धडा पूर्ण केला किंवा पुन्हा एकदा उजळणी केली – अशा छोट्या यशांचं कौतुक करा. अशा शब्दांमुळे प्रेरणा आणि मानसिक बळ मिळतं.

दरम्यान, HSC Board Exams 2025 या महत्त्वाच्या टप्प्यावर पालकांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन, आधार आणि समजूतदारपणा दाखवणं आवश्यक आहे. परीक्षेच्या यशासाठी केवळ अभ्यास नव्हे तर मानसिक आरोग्य व आत्मविश्वास टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.