
महाराष्ट्र बोर्डाने 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर बारावीच्या परीक्षा घेतल्या. यापूर्वी 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता, बोर्ड मे 2025 मध्ये बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्याची तयारी करत आहे. माहिती मिळत आहे की, यंदाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 20 मेच्या आसपास जाहीर होण्याची अपेक्षा आहे. परंतु, निकाल जाहीर होण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महाराष्ट्र बोर्डाच्या 2025 च्या बारावीच्या परीक्षेचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन प्रसिद्ध केला जाईल. विद्यार्थी निकाल लॉगिन विंडोमध्ये त्यांचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून बारावीचा निकाल पाहू शकतील.
दुसरीकडे महाराष्ट्र बोर्डाची दहावी (SSC) ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान झाली, ज्यात 16 लाख 11 हजार विद्यार्थी सहभागी झाले. महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल मे 2025 मध्ये, संभाव्यत: 15 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. तुम्ही निकाल mahresult.nic.in वर पाहू शकता. परंतु याही निकालाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. (हेही वाचा: महाराष्ट्रात 2025-26 पासून सुरू होणारा सरकारी शाळांमधील CBSE पॅटर्न कसा असणार? जाणून घ्या बोर्ड निवडता येणार का? ते SSC Board बंद होणार का?)
जाणून घ्या निकाल ऑनलाईन कसा पाहाल-
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: mahresult.nic.in
'HSC Examination Result 2025' किंवा 'SSC Examination Result 2025' या लिंकवर क्लिक करा.
तुमचा बारावीचा किंवा दहावीचा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव एंटर करा.
तुमचे गुण पाहण्यासाठी 'GET RESULT' वर क्लिक करा.
भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.
दरम्यान, 10 वीची परीक्षा व निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असल्याचे मानले जाते. कारण या नंतरच दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेता येते. या वर्षीचा निकाल हा गेल्या वर्षीपेक्षा लवकर लागू शकतो, कारण या वर्षी 10 वीची 10 दिवस अगोदर सुरु झाली होती. त्यामुळेच एसएससी बोर्ड या वर्षी चा निकाल हा 15 मेच्या अगोदर लावणार असल्याचा मानस बोर्डाने जाहीर केला आहे. मात्र त्यामध्ये उशीर होण्याचीही शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.