Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ग्लोबल कॅप्टिव्ह सेंटर्स (Global Captive Centres) अर्थातच जीसीसी (GCCs) पुढच्या 12 महिन्यांमध्ये 3.64 लाख नोकऱ्या निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. प्रसारमाध्यमांनी एका अहवालाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, NLB सर्व्हिसेसच्या इंडिया कॅप्टिव्हेटिंग रिपोर्टनुसार, GCC क्षेत्र सध्याच्या USD 35.9 बिलियन वरून 2026 पर्यंत USD 60-85 बिलियन पर्यंत वाढेल असे सांगतानाच जागतिक बाजारपेठेत सेवा क्षेत्रात मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचेही या अहवालात म्हटले आहे. जागतिक बाजारपेठेत नाविन्यपूर्ण संकल्पना आणि प्रतिभा असलेल्या मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. ही मागणीच रोजगार निर्मिती वाढ होण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. सेवा क्षेत्रातील मनुष्यबळाची हा मागणी जवळपास 34% इतकी आहे.

मुख्य प्रवाहातील रोजगारनिर्मितीस संलग्न दृष्टीकोणातून पाहता IT सॉफ्टवेअर आणि कन्सल्टिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या तरुणनांना मिळणारा रोजगाराचा वाटा हा 33% असू शकतो.  त्यासोबतच उप-क्षेत्राच्या दृष्टीकोनातून, 33 टक्के प्रतिसादकांसह IT सॉफ्टवेअर आणि कन्सल्टिंग हे टॅलेंट पूल वाढविण्यास उत्सुक आहेत. त्यानंतर BFSI (21 टक्के) आणि इंटरनेट आणि टेलिकॉम (16 टक्के) होते. आयटी आणि कन्सल्टिंग क्षेत्रासोबतच BFSI आणि टेलिकॉम क्षेत्र अनुक्रमे 21% आणि 16% आघाडीवर आहे. आयटी क्षेत्रातील रोजगार निर्मितीमध्ये बेंगळुरू शहर आघाडीवर आहे. बिझनेस स्टँडर्डने याबाबत वृत्त दिले आहे.

एनएलबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अलुग सांगतात की, जागतीक पातळीवर पाहता जीसीसी मध्ये भारतीय तरुणांचा वाटा 45% इतका आहे. हा टक्का आणखी वाढणे अपेक्षीत आहे.

कोणत्या क्षेत्रा मागणी

जागतिक पातळीवर प्रामुख्याने डेटा सायन्स, डेटा अॅनालिटिक्स, डेटा इंजिनीअरिंग, सांख्यिकीय विश्लेषण आणि UI/UX डिझाइन यासारख्या विशिष्ट डिजिटल आणि मशीन लर्निंग आदि कौशल्ये असलेल्या तरुणांना अधिक मागणी आहे. (हेही वाचा, Google Search 2022: गुगलवर 2022 मध्ये 'ही' नोकरी सर्वाधिक केली गेली सर्च; तरुणांमध्ये आहे याचं क्रेज)

दरम्यान, NLB सर्व्हिसेसच्या इंडिया कॅप्टिव्हेटिंग अहवालासाठी मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली/एनसीआर, हैदराबाद येथील

या अभ्यासात अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली/एनसीआर, हैदराबाद येथील बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI), आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण, इंटरनेट आणि दूरसंचार, आयटी सॉफ्टवेअर आणि सल्ला, उत्पादन, तेल आणि वायू आदि क्षेत्रांमध्ये सक्री असलेल्या 211 GCC कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तर रिटेल क्षेत्रातीस अभ्यासासाठी कोलकाता, मुंबई आणि पुणे येथील कंपन्यांचा विचार करण्यात आला.