Google Search 2022: आज गुगलशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती गोष्टी शोधतो माहीत नाही. या शोधाच्या आधारे गुगल दरवर्षी यादी (Google Search 2022) प्रसिद्ध करते. 2022 ची यादीही समोर आली आहे. त्यानुसार, तरुणांनी अग्निपथ योजना (Agnipath Scheme) सर्वाधिक सर्च केली आहे. ही योजना नोकरी विभागात सर्वाधिक शोधला जाणारा विषय ठरला.
यानंतर NATO दुसऱ्या क्रमांकावर, NFT तिसऱ्या क्रमांकावर आणि PFI चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर 4 चे वर्गमूळ आणि सहाव्या क्रमांकावर सरोगसी, सातव्या क्रमांकावर सूर्यग्रहण हे विषय सर्च केले गेले. याशिवाय कलम 370 आठव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या श्रेणीत आणखी दोन योजना ठेवण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Celebs Wedding in 2022: रणबीर-आलिया, नयनतारा-विघ्नेश शिवनपासून, हंसिका मोटवानी-सोहेल कथूरियापर्यंत 'या' स्टार्संनी यावर्षी बांधली लग्नगाठ)
याशिवाय सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीत भाजप नेत्या नुपूर शर्मा पहिल्या स्थानावर आहेत. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दुसऱ्या स्थानावर आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक तिसऱ्या क्रमांकावर होते. चौथ्या क्रमांकावर ललित मोदी आणि पाचव्या क्रमांकावर सुष्मिता सेनचा समावेश होता. याशिवाय सहाव्या क्रमांकावर अंजली अरोरा, सातव्या क्रमांकावर अब्दू रोझिक आहे. याशिवाय आठव्या क्रमांकावर एकनाथ शिंदे, नवव्या क्रमांकावर प्रवीण तांबे आणि दहाव्या क्रमांकावर अंबर हर्ड आहेत. (हेही वाचा - Year Ender 2022: रणवीर सिंगच्या फोटोशूटपासून ते द केरळ स्टोरीपर्यंत 2022मध्ये घडलेल्या Bollywood Controversies बद्दल सविस्तर माहिती, जाणून घ्या)
काय आहे अग्निपथ योजना?
अग्निपथ योजना केंद्र सरकारने 14 जून 2022 रोजी सुरू केली. अग्निपथ योजनेमागील उद्देश भारतातील तरुणांना सैन्यदलात सहभागी होण्यासाठी आणि भरती होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. याअंतर्गत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात भरती केली जाणार आहे. या नियुक्त्या 4 वर्षांसाठी असतील. चार वर्षानंतर 75 टक्के सैनिकांना टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात येणार आहे. त्याच वेळी, निवड झालेल्या इतर 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी नियुक्त केले जाईल. मात्र, या योजनेला मोठा विरोध झाला.