भारताचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नुकतेच टेस्लाच्या प्लांटलाही भेट दिली. भारत सरकार टेस्लाला आयात शुल्कात सवलत देण्याच्या विचारात असताना ही भेट झाली आहे. अशात टेस्लाचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माफी मागितली आहे. भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल जेव्हा कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील कंपनीच्या कारखान्याच्या भेटीसाठी आले तेव्हा आपण त्यांची भेट घेऊ शकलो नाही, यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी मंत्री योगाय्ल यांची जाहीर माफी मागितली आहे.
इलॉन मस्क म्हणाले की, गोयल यांची फ्रेमोंट प्लांटला भेट देणे हा ‘सन्मान’ आहे. याशिवाय भविष्यात त्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. X वर गोयल यांच्या पोस्टला उत्तर देताना मस्कने लिहिले की, ‘तुम्ही टेस्लाला भेट देणे हा सन्मान आहे. मी आज कॅलिफोर्नियाला भेट देऊ शकलो नाही याबद्दल दिलगीर आहे, परंतु मी भविष्यात भेटण्यास उत्सुक आहे.’
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट येथील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिल्यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, त्यांनी टेस्लाच्या फ्रेमोंट, कॅलिफोर्निया येथील अत्याधुनिक उत्पादन युनिटला भेट दिली. प्रतिभावान भारतीय अभियंते आणि वित्त व्यावसायिकांना वरिष्ठ पदांवर काम करताना पाहणे चांगले आहे. तसेच, मोटार वाहनांच्या जगात बदल करण्यात टेस्लाचे योगदान पाहून खूप आनंद झाला. (हेही वाचा: E-Air Taxis in India: भारतामध्ये 2026 पर्यंत सुरु होऊ शकते हवेत उडणारी टॅक्सी सेवा; 90 मिनिटांचा प्रवास होणार 7 मिनिटांत पूर्ण)
It was an honor to have you visit Tesla!
My apologies for not being able to travel to California today, but I look forward to meeting at a future date.
— Elon Musk (@elonmusk) November 14, 2023
पीयूष गोयल यांची ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा, भारत सरकार टेस्लाला भारतात सीमाशुल्क सवलत देण्याचा विचार करत आहे. मस्क यांनी ऑगस्ट 2021 मध्ये सांगितले होते की, जर टेस्ला भारतामध्ये वाहने आयात करण्यात यशस्वी ठरली तर, ती भारतात उत्पादन युनिट स्थापन करू शकते. मस्क यांनी सांगितले होते की, टेस्ला आपले वाहन भारतात दाखल करू इच्छित आहे, परंतु भारतातील आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.