देशातील कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. परंतु, गंभीर रूग्णांच्या उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपी हा एक प्रभावी पर्याय ठरत आहे. तथापि, कोविड विषाणूची लागण झाल्यानंतर पुन्हा बरे झालेल्या प्लाझ्मा रक्तदात्यांची संख्या अद्याप खूपचं कमी आहे. ही संख्या वाढल्यास अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचू शकतात. दरम्यान, मोदी सरकारमधील पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी स्वत: हून प्लाझ्मा दान केलं असून लोकांना प्लाझ्मा थेरपी आणि प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पोहोचून प्लाझ्मा दान केले. अशाच प्रकारे, कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान करणारे प्रधान हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणि उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. (हेही वाचा - कोरोना व्हायरस चा संसर्ग झाल्यानंतर US President Donald Trump यांनी शेअर केला व्हिडिओ; पहा काय म्हणाले)
Donated plasma at SCB Medical College and Hospital at Cuttack today. It is immensely satisfying to do my bit towards the fight against the #COVID-19 pandemic. pic.twitter.com/OWMk5VzHA7
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) October 3, 2020
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी कोरोना उपचारानंतर बरे झालेल्या निरोगी लोकांना प्लाझ्मा डोनेट करण्याचं आवाहन केले आहे. यासंदर्भात बोलताना प्रधान म्हणाले की, प्लाझ्मा दानामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. तसेच आपल्या समाजाबद्दल आपले कर्तव्य पार पाडण्याची ही चांगली संधी आहे. भारतातील कोरोना रूग्णांची कुटुंबे प्लाझ्मा दाता शोधताना दिसतात. परंतु, लोक प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. कोरोना रुग्णांकडून प्लाझ्मा दानाच्या धोक्यांचा विचार केला जात आहे.
आपल्या रक्तामध्ये चार प्रमुख घटक आहेत. डब्ल्यूबीसी, आरबीसी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. यात कोणालाही संपूर्ण रक्त दिले जात नाही. त्याऐवजी रुग्णांना स्वतंत्रपणे आणि जे आवश्यक आहे त्याचाचं पुरवठा केला जातो. आपल्या रक्तामध्ये प्लाझ्मा हा घटक 55 टक्के हलक्या पिवळ्या रंगाचा पदार्थ असतो. ज्यामध्ये पाणी, मीठ आणि इतर एन्झाइम्स असतात. एखाद्या निरोगी रूग्णातून प्लाझ्मा काढून त्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सोडणे म्हणजे प्लाझ्मा थेरपी होय.