US President Donald Trump (Photo Credits: Twitter/@realdonaldtrump)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बेथेस्डा येथील वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये (Walter Reed Medical Center) सध्या ट्रम्प यांच्यावर उपचार सुरु आहेत. एक विशेष वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या वैद्यकीय सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, राष्ट्राध्यक्ष पुढील काही दिवस वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधूनच काम करणार आहेत. तसंच पत्नी मेलानिया ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांनी दाखवलेला पाठींबा कौतुकास्पद असल्याचे व्हाईट हाऊसमधून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

उपचारासाठी वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी एक व्हिडिओ मेसेज शेअर केला. या व्हिडिओत ट्रम्प म्हणतात, "पाठींबा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मी आणि फर्स्ट लेडी दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. व्हिडिओत ट्रम्प म्हणतात, पाठींबा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मी आणि फर्स्ट लेडी दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. तरी देखील आम्ही आमच्या प्रकृतीची काळजी घेऊ. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद." (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump आणि त्यांची पत्नी Melania Trump यांना COVID 19 ची लागण)

Donald Trump Video Message:

डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार Hope Hicks यांनी कोविड-19 ची लागण झाल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलिनिया ट्रम्प यांनी खबरदारीच्या दृष्टीने कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या Ohio  येथील पहिल्या प्रेसिंडेशियल डिबेटसाठी ट्रम्प हे  Hope Hicks सोबत प्रवास केला होता.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्रम्प लवकरच बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती.